Breaking

Search this Blog

31 August 2012

MPSC : 8 Winning Steps


स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा.

1) शुभस्य शीघ्रम
कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे.


2) मूलभूत पुस्तकांचे वाचन
एनसीईआरटी, सीबीएससी, पॅटर्नची 8 वी ते 12 वीपर्यंतची पाठ्यपुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची असून त्याची टिपणे काढण्याची सवय प्रथम केली पाहिजे. या पुस्तकांमधील माहिती ही स्पर्धा परीक्षेचा खरा पाया आहे.

3) बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान
बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा. कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने वेगाने आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात. वाचनाची आवड असावी. कारण अभ्यासक्रम व्यापक असून सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) सारख्या विषयात तर `सिलॅबस' कुठून सुरू होतो व कुठे संपतो याचा अंदाज लावणेही कठीण. तो वामनाच्या तीन पावलांसारखा ब्रह्मांड व्यापू शकतो. (आणि पेपर सोडवताना ब्रह्मांडाचा अंदाजही येतो)

4) गणिताची जादू 
गणित हा कठीण वाटणारा विषय पण स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देणारा विषय आहे, पण त्याचा पाया शालेय जीवनातूनच मजबूत झाला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. यामधे काळ, काम, वेग, नातेसंबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. एक गणित 40 सेकंदांच्या आत सोडवायचे असते.

5) इंग्रजीवर प्रभुत्व 
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर, करावेच लागते. आपण चुकलो वा अडखळलो तरी चालेल, पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. तर याची सुरुवात कशी करावी? व्याकरणाकडे लक्ष द्यावे, इंग्रजी वतर्मानपत्रे वाचा, नंतर हळूहळू लहानमोठया पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनल्सवरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.

6) वेळेचे महत्त्व ओळखा
वक्तशीरपणा आणि सततचा सराव हे स्पर्धा परीक्षेचे यश आहे. आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाइमपास करतो- या सा-या बाबी महत्त्वाच्या असाव्यात. वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इ. बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्विटर, इंटरनेट यावर वेळ खर्च करू नका.

7) हस्ताक्षर आणि शुद्धलेखन 
तुमचे हस्ताक्षर आणि शुद्धलेखन हा सादरीकरणातील महत्त्वाचा भाग आहे. सुंदर हस्ताक्षर हा अभ्यासातील दागिनाच. खरे तर हा दागिना अगदी लहानपणीच घडवायचा असतो; परंतु अनेकांच्या बाबतीत तो कॉलेजवयातही विद्रुप असतो. आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर आपले नुसते ज्ञान चौफेर असून भागणार नाही, तर त्याचे सादरीकरणही चांगले हवे व त्यासाठी सुंदर हस्ताक्षर ही पहिली, तर मुद्देसूद लेखनशैली ही दुसरी पायरी आहे. शुद्धलेखनासाठी व्याकरणाची पुस्तके सतत हाताशी ठेवा.

8) व्यक्तिमत्व विकास 
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून करिअरसंदर्भातील गैरसमज दूर होतात. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो. करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तीन महत्त्वाच्या बाबी आहेत. अ) करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज). ब) करिअरसाठी आवश्यक गुणकौशल्ये (स्किल्स), क) करिअरला पूरक अशा वृत्तीतील बदल (अ‍ॅटिट्यूड). त्याप्रमाणे बदल करावेत. आपण निवडत असलेल्या पदाची विशिष्ट गुणकौशल्ये असतात व ती आपल्यात असणे अनिवार्य आहे. उदा. पोलिस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्टिव्ह माइंड, तंदुरुस्त व चपळ शरीर असावे लागते.

3 comments:

  1. डीयर सर ,
    मी विनोद संभाजी कांबळे .राहणार (मुंबई कांदिवली )
    अतिशय महत्वाची अशी माहिती आपण आम्हाला दिली . मी आता बारावी चा आब्यास करत आहे . तरी मी या माहितीचा वापर करून पुढील आभ्यासाची तयारी करेण .आपण सांगितलेल्या आठ म्हत्वाच्चा टिप्सचा मी पुरे पूर वापर करेण. आपली माहिती वाचून मला अत्यंत आनद झाला .
    आपण ही महिती आमच्या पर्यंत पोहचवली म्हणुन मि आपला आभारी आहे .
    .

    ReplyDelete
  2. Thanks for the best tips. Already spent so much time in finding the useful content. Finally get it here!
    MPSC

    ReplyDelete
  3. extremely thankful to you sir !!!!!

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा