🔰अभ्यास नियोजन
संयुक्त पूर्व परीक्षा 2020
विषय:चालू घडामोडी
मित्रांनो नमस्कार,11 एप्रिल रोजी होत असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी विषयाचा आवाका परीक्षा लांबल्याने खूप मोठा झाला आहे.अनेक विद्यार्थी मित्र सातत्याने या विषयाचा अभ्यास नेमक्या स्वरूपात कसा करता येईल याबाबत विचारणा करत आहेत.
त्यासाठी आजचा हा लेख.
मित्रांनो चालू घडामोडी चा कालावधी आपल्याला जरी मोठा वाटत असला तरी योग्य नियोजन केले तर हा विषय आपण आवाक्यात आणू शकतो.
कालावधी: साधारण 2019 व 2020 हे संपूर्ण वर्ष संदर्भ म्हणून जरी दिसत असले तरी मार्च 2020 ते नोव्हेंबर 2020 मध्ये तुरळक काही घटना सोडल्यास काही मोठ्या घटना घडल्या नाहीत.कारण अर्थात कोरोना व lockdown.
त्यामुळे 2019 हे वर्ष ,जानेवारी ते मार्च 2020 व नोव्हेंबर 20 ते फेब्रुवारी 21 हा कालावधी आपण अभ्यासासाठी पकडू.
संदर्भ साहित्य: 2019 सालचे सकाळ किंवा कोणतेही एक चांगले इयरबुक किंवा परिक्रमा मासिक वरती सांगितलेल्या काळासाठीचे अभ्यासा साठी वापरा.
अभ्यास कसा कराल?
नेमके हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही.
वर सांगितल्या प्रमाणे या विषयाला टॉपिक व सबटॉपिक मध्ये विभागा.
जसे की पुरस्कार त्यात राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पुरस्कार असे.
आता प्रत्येक टॉपिक चा अभ्यास Separately 2019 पासून ते आतापर्यंत करा. म्हणजे प्रत्येक 2019-20 मधील पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती एकदाच करा.
यामुळे तुमची अभ्यासात लिंक तयार होईल. एक टॉपिक सलग केल्याने तो जास्त लक्षात राहील.
असेच प्रत्येक टॉपिक चे करा. सलग एयरबुक किंवा मासिक कृपया वाचू नका.
त्याने तुमचे समाधान होईल पण लक्षात काहीच राहणार नाही.
रोज एक जरी टॉपिक केला तरी 15-20 दिवसात पूर्ण चालू घडामोडी टॉपिक तुमच्या आवाक्यात येईल.
गोंधळ होणार नाही.
मासिके वाचताना देखील सर्व मासिके समोर ठेऊन एकच टॉपिक 2019 पासून 20 पर्यंत वाचा. महिन्याचे मासिक वेगळे वेगळेवाचू नका.
वार्षिक कालावधीने घडणारे विषय जसे की पुरस्कार ,परिषदा ,अहवाल इ. हे 2019 व 20 हे एकाच ठिकाणी लिहून घ्या म्हणजे लक्षात राहील. जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नात याचा फायदा होतो.
हे लक्षात असू द्या की आयोगाचा आजवरचा इतिहास पाहता आयोग 80% चालू घडामोडी वरील प्रश्न हे 5-6 महिन्या पूर्वीचेच जास्त विचारतो.
आणि जास्तीत सराव करा.बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रश्नपत्रिका xerox काढून सोडवा.त्यात कमी-जास्त मार्क आले तरी निराश होऊ नका.त्या फक्त सराव व Revision साठी असतात .आयोगाचा पॅटर्न वेगळा असतो.कोणताही classwala त्याची बरोबरी करू शकत नाही.
काही समस्या असतील तर नक्की विचारा.
वर मांडलेले विचार हे माझ्या वैयक्तिक अनुभवातून आलेले आहेत.कोणी सहमत नसेल तर त्याने त्याच्या पद्धतीने जावे.
- धीरज चव्हाण (STI/ASO/SA)
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा