Breaking

Search this Blog

11 November 2013

MPSC म्हणजे काय रे भाऊ ? | MPSC ची संपूर्ण ओळख | Introdution to MPSC Exam

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग

हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.

या आयोगाद्वारे राज्य शासनातील गट अ ,ब ,क या तिन्ही स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दरवर्षी स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले जाते.यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी आपले नशीब आजमावत.

✍ MPSC द्वारे खालील सेवांतील अधिकारी-कर्मचारी निवाडीकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते

  ✍ - राज्यसेवा परीक्षा

 ✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

  ✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा

   ✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा

   ✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा

   ✍- दिवाणी  न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा

   ✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा(AMVI)

   ✍ - संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)

    ✍- संयुक्त गट क परीक्षा (Tax Asst-Clerk-Excise SI)

वरीलपैकी  खालील 3 परीक्षेसाठी कोणत्याही पदविशाखेचा उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र आहे.

1) राज्यसेवा परीक्षा(Dy Collector, तहसीलदार, Dysp इ.)

2) संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)

3) संयुक्त गट क परीक्षा (Clerk-Tax Asst-Excise SI)


वरील परीक्षांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ.

1) राज्यसेवा परीक्षा(Dy Collector, तहसीलदार, Dysp इ.)

 राज्यशासनातील गट अ व गट ब (राजपत्रित) पदांच्या भरतीसाठी या परीक्षेचे दरवर्षी आयोजन केले जाते)

राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदे

    ✍- उपजिल्हाधिकारी (गट अ)

   ✍ - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)

   ✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ

    ✍- साहाय्यक राज्यकर आयुक्त (गट अ)

    ✍- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)

    ✍- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)

   ✍ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)

    ✍- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)

    ✍- तहसीलदार (गट अ)

    ✍- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)

    ✍- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)

    ✍- कक्ष अधिकारी (गट ब)

    ✍- गटविकास अधिकारी (गट ब)

    ✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद,  (गट ब)

    ✍- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)

    ✍- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)

    ✍- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)

    ✍- नायब तहसीलदार (गट ब)

जाहिरात- दरवर्षी डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते. https://www.mpsc.gov.in या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.

अर्ज करण्यासाठी : खालील साईट वरती जाऊन प्रथम आपली प्रोफाईल तयार करावी.

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx


MPSC परीक्षेला अर्ज करण्यासाठी नवीन प्रोफाइल कशी तयार कराल ? 


परीक्षेसाठी पात्रता:-
* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक.


* वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.


* शारीरिक पात्रता -
१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक


महिला उमेदवारांकरिता
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक


महिला उमेदवारांकरिता
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)


३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .


महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .

परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 3 टप्प्यात घेतली जाते.

1)पूर्वपरीक्षा : 2 पेपर ,एकूण 400 गुण (एप्रिल मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 6 पेपर ,एकूण 800 गुण(जुलै किंवा ऑगस्ट)
3)मुलाखत : 100 गुण (डिसेंबर किंवा जानेवारी)

MPSC Rajyaseva 2021 Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची

पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.

अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परीक्षा व मुलाखतीचे एकूण गुण गृहीत धरले जातात.

मुलाखतीस पात्र होण्यासाठी जाहिरातीत नमूद पदांच्या 3 पट विद्यार्थी निवडले जातात.

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.

2) संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)

राज्यशासनातील PSI-STI-ASO या तीन अराजपत्रित पदांच्या निवडीसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.पूर्वी या प्रत्येक पदांसाठी वेगळी परीक्षा होत असे. पण सन 2017 पासून यात बदल होऊन या तिन्ही पदांची पूर्वपरीक्षा एकत्र होत आहे.

PSI-पोलीस उपनिरीक्षक  हे पोलीस दलातील पद असून याबद्दल वर्दीमुळे विद्यार्थ्यांना जास्त आकर्षण आहे.नियुक्ती कोणत्याही पोलीस स्टेशनला सर्व राज्याभरात कुठेही मिळू शकते.

STI- राज्य कर निरीक्षक : हे GST विभागातील पद असून या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा पाहावयास मिळते.नियुक्ती जिल्ह्याची ठिकाणी सर्व राज्यभरात कुठेही मिळू शकते.

ASO- सहायक कक्ष अधिकारी : मंत्रालयीन संवर्गातील हे पद असून मंत्रालय ,मुंबई येथेच कायमची नियुक्ती असल्याने विद्यार्थ्यांत या पदाचे जरा कमी आकर्षण आहे.

जाहिरात- दरवर्षी मार्च च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते. https://www.mpsc.gov.in/1035/Home  या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.

परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 3 टप्प्यात घेतली जाते.
फक्त PSI साठीच शारीरिक चाचणी व मुलाखतीचे आयोजन केले जाते,बाकीच्या पदांसाठी नाही. 

STI आणि ASO साठी  खालील क्रमांक 1 आणि 2  टप्पेच  अंतर्भूत आहेत 

1)पूर्वपरीक्षा : 1 पेपर ,एकूण 100 गुण (परीक्षा मे मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 2 पेपर ,एकूण 400 गुण (ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर)
3)फक्त PSI साठी मुलाखत (40 गुण)व शारीरिक चाचणी(100 गुण )- (डिसेंबर किंवा जानेवारी)

तिन्ही पदांसाठी संयुक्तरित्या एकाच पूर्वपरीक्षेचे आयोजन केले जाते.
पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.

" संयुक्त  गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची 

वरील प्रत्येक पदाची मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 (भाषा व GK) ,200 गुण :हा तिन्ही पदांसाठी संयुक्त आहे.
तर पेपर क्रमांक 2 (पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान),200 गुण: हा तिन्ही पदांसाठी स्वतंत्र आहे.

STI व ASO च्या अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परिक्षेचेच एकूण गुण गृहीत धरतात.

PSI साठी   मुलाखत व शारीरिक चाचणी व मुख्य परीक्षेचे एकूण गुण गृहीत धरले जातात.

PSI च्या शारीरिक चाचणी व मुलाखतीला पात्र होण्यासाठी मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे एकूण जाहिरातीत नमूद पदांच्या 3 पट उमेदवार निवडले जातात.

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.

3) संयुक्त गट क परीक्षा (Tax Asst-Clerk-Excise SI)

राज्यशासनातील Tax Asst-Clerk-Excise SI या तीन गट क पदांच्या निवडीसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.पूर्वी या प्रत्येक पदांसाठी वेगळी परीक्षा होत असे. पण सन 2017 पासून यात बदल होऊन या तिन्ही पदांची पूर्वपरीक्षा एकत्र होत आहे.

Excise SI -दुय्यम निरीक्षक हे  राज्य उत्पादन शुल्क विभागातील पद असून वर्दीमुळे याबद्दल  विद्यार्थ्यांना जास्त आकर्षण आहे.नियुक्ती कोणत्याही उत्पादन शुल्क विघागत  राज्यभरात कुठेही मिळू शकते.

Tax Asst-  कर निरीक्षक : हे GST विभागातील पद असून या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा पाहावयास मिळते.नियुक्ती जिल्ह्याची ठिकाणी सर्व राज्यभरात कुठेही मिळू शकते.

Clerk- लिपिक : मंत्रालयीन संवर्गातील हे पद असून ,मंत्रालय ,मुंबई येथेच कायमची नियुक्ती असल्याने विद्यार्थ्यांत या पदाचे जरा कमी आकर्षण आहे.

जाहिरात- दरवर्षी एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते. https://www.mpsc.gov.in/1035/Home  या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.

परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 2 टप्प्यात घेतली जाते.

1)पूर्वपरीक्षा : 1 पेपर ,एकूण 100 गुण (परीक्षा साधारण जून मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 2 पेपर ,एकूण 200 गुण (सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर)

तिन्ही पदांसाठी संयुक्तरित्या एकाच पूर्वपरीक्षेचे आयोजन केले जाते.
पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.

वरील प्रत्येक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 (भाषा व GK) ,100 गुण :हा तिन्ही पदांसाठी संयुक्त आहे.
तर पेपर क्रमांक 2 (पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान),100 गुण: हा तिन्ही पदांसाठी स्वतंत्र आहे.

अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परिक्षेचेच एकूण गुण गृहीत धरतात.

" संयुक्त  गट क संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची 

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.

संधी एकदाच येते परत येत नाही

      खालील पुस्तके आवश्यक वाचण्यास द्यावीत

1)अधिकारणी   

2)गरूड झेप

3) स्टिल फ्रेम

4) ताई मी कलेक्टर होणार 

5)राजमुद्रा 

6)IAS मंत्रा

अशी अनेक पुस्तके वाचण्यास द्यावित.

विचार करा. लवकर सुरवात करूया,आणी करिअर घडवूया.

  

राज्यसेवेतील पदांची थोडक्यात ओळख

 👍महसूल सेवा  

👍उपजिल्हाधिकारी(Dy. Collector)

हे राज्य सेवेतील उच्च पद मानले जाते. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि 18 ते 20 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.

नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप

पुढीलप्रमाणे आहे-

✍- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.

✍- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती  अद्ययावत ठेवणे.

✍- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.


👍🏻मुख्याधिकारी गट-अ (CO)

✍🏻या पदांची संख्या कमी आहे. आयोगामार्फत कधीतरी जागा निघतात. 

✍अ वर्ग नगरपालिकांसाठी मुख्याधिकारी नियुक्त केला जातो. शहरांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण  पद आहे. 

✍यातील काहींची महानगरपालिकेत उपायुक्त पदावर पदस्थापना केली जाते. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी काम करण्यासाठी नगरविकास विभागातील महत्त्वाचे पद आहे.

    🏇तहसीलदार🏇

✍या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -

✍- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.

✍- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.

✍- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.


   🏇 नायब तहसीलदार 🏇

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-

- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.

- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.

- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.

- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.


    ✍महाराष्ट्र पोलीस सेवा🏇

पोलीस उपअधीक्षक (DySP/ACP)

राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-

- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.

- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.

- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.


   ✍ महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा

शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.

राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-

- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.

- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.

- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.


     ✍वस्तू व सेवाकर(GST) विभाग म्हणजेच पूर्वीचा विक्रीकर (व्हॅट) विभाग

GST हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. GST विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य कर निरीक्षक(STI) पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित केली जाते.तर  सहाय्यक राज्यकर आयुक्त (ACST) हे पद राज्यसेवेतून भरले जाते.

ACST च्या जबाबदाऱ्या-  व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.

STI च्या जबाबदाऱ्या- प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी राज्य कर  निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही राज्यकर निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.


    ✍मोटार वाहन विभाग

साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब (ARTO)

 हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-

शिकाऊ व पक्के ड्रायव्हिंग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.


    ✍राज्य उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.

राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.

राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक-  

या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-

मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.


मंत्रालय संवर्ग 

कक्ष अधिकारी

    कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप

कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली तरी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार कक्ष अधिकाऱ्याला असतात.

आयोगाकडून साहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.

MPSC पास व्हायला किती वेळ लागतो ? नक्की वाचा



No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा