Special 40 Batch

Search This Blog

MPSC & UPSC Book List

यूपीएससीचे (आणि एमपीएससीसुद्धा) पेपर्स तपासले जात
असताना अलीकडच्या काळात उत्तरांमधला एकसाचीपणा परीक्षांना जाणवत
असणार आहे. धक्कातंत्रांचा अवलंब करून यूपीएससीचे पेपर्स काढणे
आणि परखड परीक्षणातून अनेक नियमित अभ्यास करणाऱ्यांना स्पर्धेतून
बाहेर काढणे अशा बाबी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मार्गदर्शन
वर्गाच्या प्रचंड जाहिरातबाजीमुळे आणि मार्केटतंत्राच्या वापरातून
रेडिमेड मटेरिअल खपविण्याच्या स्पर्धेमुळे "सकस काय' आणि त्याचे
पारायण कसे करायचे हेच विसरायला होत आहे. अनेक क्षमता असणारे
विद्यार्थी या भूलभुलय्याला बळी पडत आहेत. दिवसाला एवढे तास, विशिष्ट
प्रकारच्या नोटस् आणि कुणीतरी चावून दिलेले गिळले की क्लास वन
अधिकारी झालो अशा समजुतीतून अभ्यास करणारी अनेक मुले
आजूबाजूला दिसताहेत. यातून यशापेक्षा निराशाच पदरी पडणार आहे.
त्यामुळे यूपीएससीचा अभ्यास करताना आत्यंतिक गरज कोणती आहे तर
'Back to Basics'
जाण्याची. थोडक्यात, अर्थगर्भ संदर्भांचे तितक्याच अर्थपूर्ण
प्रक्रियेद्वारे वेळ आणि बौद्धिक व मानसिक ऊर्जा देऊन आकलन करून घेणे
आवश्यक आहे. त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे हे संदर्भ समजणे.
खाली काही महत्त्वाच्या संदर्भांची यादी दिली आहे. कोणतीही तडजोड न
करता या संदर्भाचा वापर करणे गरजेचे आहे. एकदा वाचून हे संदर्भ समजत
नाही. मात्र पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्यात दडलेल्या अर्थाचे विश्लेषण आणि त्यातून निश्चितपणे आकाराला येणारा आत्मविश्वास
यांचा अनुभव येतो. सर्वच संदर्भांची सर्वांत अलीकडची (Latest) आवृत्ती अभ्यासणे कधीही जास्त हितावह आहे.
1. Introduction to constitution of India - D. D. Basu
2.Our Constitution - Subhash Kashyap
3. Our parliament - Subhash Kashyap
4. Indian Polity - Laxmikant
5. Indian economy - Dutt, Sundaram
6. Indian economy - Migra, Puri
7. Indian economy, environment and Policy - Ishwar Dhingra
8. Indian economy - Prartiyogita Darpan
9. India : A comprehensive geography - D. R. Khullar
10. Human and economic geography - Goh Cheng Leong
11. Certified physical and human geography - Goh cheng Leong
12. Geography of India - Majid Hussain
13. Science and Technology - Spectrum Pub. Delhi
14. Science and Technology - Tata McGraw Hill Pub
15. India's Struggle for Independence - Bipin Chandra
16. History of Modern India - Grover and Grover
17. A brief history of Modern India - Spectrum pub. Delhi
18. India since Independence  - Bipin Chandra
19. The gazetteer of India, History and Culture
20. India's foreign ploicy - Muchkund Dubey
21.Challenges and strategy : Rethinking India's foreign Ploicy - Rajiv Sikri
22.International Organisations - Spectrum pub., Delhi
23. Social Problems in India - Ram Ahuja
24. Social issues- Unique Pub., Delhi
25. Social Issues - Spectrum Pub., Delhi
26. Social Psychology  - Baron, Byrne, Bhardwaj
27. Working with emotional Intelligence - Daniel Goleman
28. Manorama Year Book d India 2013 (
भारत सरकार)
29. NCERT books of History, Geography and Science
30.National Institute of Open Schooling Mr
ची पुस्तके
31.Magazines - Economic and Political Weekly, Frontline, Outlook, Economist, Civil Services Chronicle,
Competition Wizard, Civil Services Times
32.Newspapers - Indian Express, Hindu, The Times of India, Economic Times.
33. Surves :
विविध मंत्रालयांतर्फे प्रसिद्ध होणारे वार्षिक सर्व्हे. उदा. Economic Survey, National Family Health
Survey
इत्यादी.
वरील यादीमधील क्र. 1 ते 30 पर्यंतचे संदर्भ हे मूलभूत आणि सूक्ष्म स्तरावरच्या आकलनासाठी महत्त्वाचे आहेत; तर क्र. 30 ते 33
मधील संदर्भ हे त्या आकलनाला सद्य:स्थितीत उपयोजनात्मक पातळीवर आणायचे कसे याबाबतची दिशा देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

2 comments:

 1. sir kahi samasya ahet...
  1- Simant shetakari mhanaje kay?
  2- bhandaval pradan gunottar mhanje kay?
  3- bhandval paryaptata gunottar mhnaje kay?

  (sorry join zalyabarobar prashna vichartoy...pan uttar sapadat nahiye mhnun vichartoy!)

  ReplyDelete
 2. Sir. Thank u ao much. Baghun bara watay kon tari ahe je niswarthi budhine madadat karatay..sir tumhi jya baddal bolata tya dakka tantracha mala khup motha dhkaa basala ahe..me magache 3 years tayari karatoy pan majha me fakta thokalyasarkhi books ratta marali ani tyache parinam bhogat ahe..tari sir jar tumhi psi sti asst sathi pre ani mains sathi kuthali books base pakka karanyasathi waparayachi hey sangaitalat tar khup upakar hotil tumach..majha email id ahe kaustubhj23@gmail.com nai tar tumhi ya bloog war load kelat tari chalel

  ReplyDelete

आपला अभिप्राय येथे नोंदवावा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Blogger Widgets