Breaking

Search this Blog

24 September 2019

MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षेची घटकनिहाय तयारी : STI धीरज चव्हाण 2nd Rank



 या लेखामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या पदनिहाय अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करू.
1)   नियोजन प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा अभ्यास करताना योजनांची उद्दिष्टे, ध्येयवाक्ये, प्रतिमाने, सुरू झालेल्या विकास व कल्याणकारी योजना, राजकीय आयाम, कालावधी, ठळक निर्णय, मूल्यांकन यांचा आढावा घ्यायला हवा. निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.
2) सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणजेच रोजगार, दारिद्रय़, भूक, मानवी विकास, व्यवसाय सुलभता याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान व राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे स्थान माहीत करून घ्यावे.
3) राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण यांचा अभ्यास करताना ७३ वी व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविलेले अधिकार माहीत करून घ्यावेत.
4) भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा यांचा अभ्यास करताना अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे या उपघटकाची तयारी करता येईल.
5) भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यांचा अभ्यास करताना आर्थिक व राजकीय अशा दोन्ही आयामांचा विचार करायला हवा. म्हणजेच याबाबतची आर्थिक पार्श्वभूमी आणि याबाबतचे शासकीय पातळीवरील प्रयत्न यांचा अभ्यास करायला हवा.
6)  शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास :  ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट, तार व दूरसंचार), रेडिओ, टीव्ही, इंटरनेट या पायाभूत सुविधांचे आर्थिक विकास आणि सामाजिक अभिसरण यातील योगदान आणि भारतातील त्यांच्या विकास व विस्ताराचे टप्पे व त्यासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता यांवर विशेष भर द्यायला हवा.
               तसेच भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमधील प्रादेशिक असमतोल, गुंतवणूक, दर्जा व इतर समस्यांचा बारकाईने अभ्यास करावा. इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे पर्याय म्हणून खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय., खासगीकरण या धोरणांमागची भूमिका व त्यातील तरतुदी समजून घ्याव्यात. राज्य व केंद्र सरकारची वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची धोरणे समजून घ्यावीत तसेच याबाबत चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
7) आर्थिक सुधारणा व कायदे :  पार्श्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा यांचा संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.
  केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणांचे टप्पे व त्यांचे परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.
WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या आणि त्याबाबतच्या चालू घडामोडी समजून घेणे आवश्यक आहे.
*    GST,  विक्रीकर, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे व नियम मुळातून वाचणे जास्त व्यवहार्य आहे. यातील ठळक तरतुदी माहीत असायलाच हव्यात.
8)   आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ
*    जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व काल, वाढ, रचना या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, निर्यातीतील वाढ या बाबींची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून अद्ययावत करून घ्यावी.
*    भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, हळड आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ यातील महत्त्वाचे टप्पे समजून घ्यावेत. तसेच चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.
*    प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) व्यापार त्याबाबतचे शासकीय धोरण समजून घ्यावे. बहुराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, कटा जागतिक बँक, कऊअ इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग या संस्थांचे कार्य, महत्त्वाचे नियम / ठराव, सदस्य, यातील भारताची भूमिका / योगदान समजून घ्यावे.
9)   सार्वजनिक वित्त व्यवस्था
*    कर आणि करेतर महसुलाचे स्रोत,केंद्र व राज्य सार्वजनिक खर्च या संकल्पना समजणे आवश्यक आहे.
*    केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, सार्वजनिक खर्चवाढ यांची कारणे समजून घ्यावीत. सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारीत अर्थसंकल्प, वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी माहीत असायला हव्यात.
*    भारतातील केंद्र व राज्य पातळीवरील करसुधारणांचा आढावा महत्त्वाचे टप्पे, त्यांची पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, यशापयश या मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.
*    सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या या बाबी विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी तयार कराव्या. त्यासाठी संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
*    राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण या संकल्पना समजून घ्याव्यात. तूट नियंत्रणासाठीचे केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, केंद्र व राज्यस्तरावरील राजकोषीय सुधारणा यांचा आढावा घ्यायला हवा.

पुस्तक यादी  : STI मुख्य परीक्षा 

 अर्थव्यवस्था  ( Concept क्लिअर असतील तरच Scoring )
1. महाराष्ट्र 11 वी व 12 वी चे  क्रमिक व NCERT चे  11वी चे पुस्तक Download
2. मृणाल चे Videos on Economy :85 Lecture to watch Click Here
3. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे (पूर्ण वाचा ) व 
   हे 3 घटक :- पायाभूत सुविधा /आर्थिक सुधारणा /आंतरराष्ट्रीय व्यापार-संस्था : किरण देसले मधून करा 
4. आर्थिक पाहणी -  महाराष्ट्र
5. प्रतियोगीता दर्पण - 
Economics Special Issue 
6. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा  (40% प्रश्न Repeat )
7. प्रश्नसंच: दीपस्तंभ चा अर्थशास्त्र प्रश्नसंच सोडवा 

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा