Breaking

Search this Blog

30 January 2020

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 : CSAT :बुद्धिमत्ता व अंकगणित आधारित प्रश्नांची तयारी By Dheeraj Chavan STI/ASO

राज्यसेवा पूर्व परीक्षामधील CSAT या पेपरमधील उतारे आणि त्या संबंधित आकलन क्षमता या विषयची माहिती आपण मागील लेखांमधून बघितली होती. आजच्या लेखातून CSAT पेपरमधील बुद्धिमत्ता व अंकगणित आणि निर्णय प्रक्रिया व समस्या सोडवणूक (Decision Making) या उपघटकांविषयी माहिती बघू या.


 CSAT या पेपरमध्ये एकूण ३० पैकी २५ प्रश्न बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकावर विचारलेले जातात. या घटकाला ६२.५ गुणांचे वेटेज या पेपरमध्ये दिलेले आहे. आयोगाने अभ्यासक्रम अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical & Analytical Reasoniry) सर्वसामान्य बुद्धिम‌त्ता चाचणी (Generak Mental Ability) या घटकासाठी पदवी दर्जाला धरून प्रश्नाची कठीण पातळी गृहीत धरली जाते आणि मूलभूत अंकगणित (Basic Numeric) सामग्री विश्लेषण (Data Interpretion) या घटकासाठी दहावीचा दर्जा ग्राह्य धरण्यात आला आहे. आयोगाने जरी या घटकांवरील प्रश्न विचारण्यासाठी दहावी/पदवी अशा दर्जाचा निकष सांगितलेला असला तरी या घटकावरील प्रश्नांची काठिण्य पातळी ही थोडी अधिक असते. परंतु या घटकाची योग्य नियोजनबद्ध तयारी केली तर २५ पैकी किमान १५ प्रश्न सोडवता येऊ शकते.


अ) बुद्धिमत्ता चाचणी : अनुमानात्मक चाचणी आणि विश्लेषणात्मक चाचणी यामध्ये प्रश्नामध्ये एखादी माहिती दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तरे येणे आवश्यक असते. यामध्ये प्रश्नांचे स्वरुप पुढील प्रमाणे असते. जसे दिलेल्या उताऱ्याच्या आधारे माहिती संबंधितील उचित अर्थनिर्वचन निवडा म्हणजेच select the appropriate interoretations किंवा पुढील विधानांचा अभ्यास करून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल असे अनुमान निवडा. किंवा पुढील विधानाचे परीक्षण करून पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा किंवा काही विधान व निष्कर्ष दिलेले असतात त्याचा अभ्यास करून योग्य तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. अशा प्रकारचे वाक्यांचे स्वरुप असलेले ३-४ प्रश्न विचारलेले दिसतात. प्रश्नांमध्ये दिलेली माहिती, विधाने योग्य रित्या वाचून अनुमानात्मक कौशल्य आरि विश्लेषणात्मक कौशल्य वापरून योग्य ते उत्तर देणे अपेक्षित आहे. या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आयोगाच्याच गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वारंवार सोडवून बघणे योग्य ठरते.


संदर्भ पुस्तक :R S Agrawal Verbal Non Verbal मराठीतून अभिनव प्रकाशन चे 


ब) सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी : General Mental Ability या घटकात अक्षरमालिका पूर्ण करणे किंवा किंवा दिलेल्या आकृत्यावरून आकृतीमधला सहसंबंध ‌ओळखणे, कूट प्रश्न सोडविणे, सिलोलिझमवरील प्रश्न, नाते संबंधावरील प्रश्न, कॅलेंडर आधारित प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणीत होतो. या घटकावर सर्वसाधारणपणे ५ ते ६ प्रश्न विचारले जातात. या घटकावरील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात बरेचसे साहित्य किंवा संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्यरित्या सराव केल्यास या घटकावरील प्रश्न सोडविता येतात. यासाठी आयोगाच्या गतवर्षीच्या संपूर्ण प्रश्न‌पत्रिका; तसेच PSI/STF/ASOच्या पूर्वमुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार ‌सोडविणे आणि ज्या प्रकारचे प्रश्न परत परत विचारले जातात ते अगदी पक्के करून ठेवणे उपयुक्त ठरते. बुद्धिमत्ता व अंकगणित या घटकावर विचारले जाणाऱ्या २५ पैकी सर्वसामान्य बुद्धिमत्ता चाचणी या उपघटकातील प्रश्न सहज सुटणारे असतात. त्यामुळे या भागावरील गुण निश्चितच करण्याचा प्रयत्न करावा. आकृत्या व चित्रांवरील प्रश्नांचा सराव R S Agrawal - Non Verbal यातूनच  करावा .

संदर्भ पुस्तक :R S Agrawal Verbal Non Verbal ,मराठीतून अभिनव प्रकाशन चे 


क) अंकगणित : अंकगणिताशी संबंधित असलेल्या घटकावर साधारणत: ८ ते १२ प्रश्न विचारलेले जातात. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये संख्या, संख्यात्मक संबंध, घातांक इत्या तसेच सरासरी लांबी, रुंदी, चौरस, वर्तुळ, त्रिकोण, क्षेत्रफळ, या संबंधिची प्रश्नसुद्धा विचारलेली दिसतात. गुणोत्तर प्रमाण, काम, काळ, मजुरी, वेळ, वेग, अंतर, नफा-तोटा अशा प्रकारातील गणिते किंवा प्रश्न सुद्धा विचारलेली असतात. या घटकासाठी मूलभूत अंकगणिताच्या ज्ञानाची स्पष्टता असणे गरजेची आहे. वर उल्लेखलेल्या प्रकारांचा सराव बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्यांमधून योग्य पद्धतीने केल्यास या घटकावर सुद्धा किमान ५ ते ६ प्रश्न सोडविता येतात.

संदर्भ पुस्तक : R S Agrawal Quantitative Aptitude ,मराठीतून अभिनव प्रकाशन चे 


ड) सामग्री विश्लेषण : Data Interpretation यामधील प्रश्नांमध्ये आपल्याला बरीच माहिती पुरवलेली असते. त्या माहितीचे पृथ:करण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागते. तसेच या प्रश्नात तक्ते, आलेख, टेबल, सामग्रीचा पुरेसापणा इत्यादी बाबींवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. या घटकावर ४ ते ५ प्रश्न विचारलेले जातात. या प्रश्नांच्या सरावासाठी सुद्धा पहिले आयोगाच्याच गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघाव्या. आणि जो भाग अवघड जात असेल त्यासाठी संदर्भ पुस्तकांचा वापर करून योग्य सराव केल्यास याही घटकावरील प्रश्नांची उत्तरे सोडविता येऊ शकतात.

R S Agrawal Quantitative Aptitude ,मराठीतून अभिनव प्रकाशन चे 

इ ) निर्णय प्रक्रिया व समस्या सोडवणूक (Decision Making & Problem Solving) :या टॉपिक वर मागील प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करावा .शक्यतो दिलेल्या पर्यायातील संतुलित पर्याय निवडावा . 


    काही महत्वपूर्ण सूचना :

  • तयारी करताना आधी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेल्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून टॉपिक नुसार तयारी सुरु करावी . 
  • प्रत्येक टॉपिक वर youtube  वरती स्पष्टीकरणासाठी खूप सारे विडिओ उपलब्ध आहेत . 
  • Study Iq,Mahendra Guru ,Exam Race  व इतर चॅनेल वरील व्हिडिओ चा चांगला वापर तुम्ही करू शकता . 
  • शक्यतो एका टॉपिक वर एकच व्हिडिओ वारंवार बघून त्यातील tricks आत्मसात करून पुस्तकातील Unsolved  Problems सोडवण्याचा प्रयत्न केला तर या विषयावर आपण मात करू शकता .  
  • CSAT च्या मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या कमीत कमी ३० प्रश्नपत्रिका आपण सोडवायला हव्या . 
  • सरावासाठी दुपारी ३ ते ५ चा वेळ निवडावा ,म्हणजे परीक्षेच्या वेळेशी हा वेळ सुसंगत होतो. 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्यातील चुकलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पुन्हा एकदा व्हिडीओ मधून बघावे . 

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा