नुकत्याच जाहीर
झालेल्या MPSC च्या
वेळापत्रकात
राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित आहे . सन
२०११ नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रियापद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा
बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते आणि वेळापत्रकाप्रमाणे
दरवर्षी परीक्षा होते. पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची
पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो
उमेदवारांना एक नवा विश्वास मिळाला आहे. त्यामुळे कसलीही कारणे किंवा सबबी न देता
परीक्षांची संधी घेतली पाहिजे. त्याची तशी तयारीही आपण केली पाहिजे.
अभ्यासाचे नियोजन
करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवडय़ांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध
वेळ, घटक विषयांपैकी सोपे-अवघड किंवा कमी सोपे-कमी
अवघड वा जास्त सोपे-जास्त अवघड विषयानुरूप वेळेची विभागणी आणि योग्य अभ्यास
साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल. मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात
असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम
घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते.
तेव्हा नव्या उमेदवारांनी अशा अचूक मार्गदर्शनासाठी ‘सिनियर्स’ ची जरूर मदत
घ्यावी.
दरवर्षी परीक्षेस
बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स अर्थात सिनियर
उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची
संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा
अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे काही आडाखे
असतात.
कोणत्या घटक
विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ
पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा,
याविषयी नेमके
धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे
ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांचा
योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तरच या दृष्टिकोनाच्या निकषावर बेतलेले
पूर्वानुभवाचे ज्ञान फायद्याचे ठरेल. नाही तर अनुभव शिकण्यासाठी परीक्षेच्या एका
संधीवर पाणी सोडावे लागेल. म्हणून योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
अभ्यास धोरण
ठरवताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. मागील काही
वर्षांच्या प्रश्नांच्या अभ्यासातून, तुम्हाला ‘कसा अभ्यास करू’ या प्रश्नाचे
उत्तर मिळत जाईल, कळत जाईल. म्हणून प्रश्नपत्रिका विश्लेषण हा
अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील लेखापासून पूर्व परीक्षा प्रश्नांचे
घटकवार विश्लेषण करून अभ्यास कसा करावा याची चर्चा करण्यात येईल.
सध्या मी माझ्या
अनुभवातून तयार केलेली पुस्तकांची यादी व ५ एप्रिल पर्यंतचे,जवळपास 108 दिवसांचे अभ्यासाचे रोजचे तासानुसार नियोजन कसे असावे याचा नमुना देत आहे .
परीक्षा जरी पुढे ढकललेली असेल किंवा जे नवीन विद्यार्थी ही पोस्ट नंतर वाचत असतील त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार यात बदल करू शकता .
आशा आहे आपल्या
सर्वांना याचा नक्की फायदा होईल.
- धीरज चव्हाण, STI
/ ASO (राज्यात २ रा )
पुस्तकांची यादी |
108 दिवसांचे अभ्यास नियोजन |
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 - पुस्तक सुची
पेपर 1 : सामान्य अध्ययन
1) इतिहास-
A)राज्यशासनाची नवीन शालेय पाठ्यपुस्तके 5th to 12th
B)प्राचीन व मध्ययुगीन भारत - Lucent Gk
C)आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे(यापैकी कोणतेही एक)
D)महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे(कोणतेही एक) पूर्वला वाचन झाले नाही तरी काही फरक पडत नाही.मुख्य परीक्षेला मात्र खूप गरजेचे आहे .
Note: सर्वात कमी अभ्यास या विषयचा करा.खूप प्रश्न आपण वाचलेल्या पैकी नसतात.एकच पुस्तक वाचा चांगले आणि जेवढे आपल्याला येतील तेवढं प्रश्न इतरांना येतात.त्यामुळे जास्त वाचनाच्या फंदात नाका पडू.
प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या नादात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.
प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या नादात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त पुस्तके वाचण्याचा मोह टाळा आणि कमीत कमी वेळ या विषयाला द्या.
2) भूगोल-
A)राज्यशासनाची जूनी शालेय पाठ्यपुस्तके 4th ते 12th
B) Lucent GK: जागतिक भूगोल व इतर संक्षिप्त माहिती यातून वाचून घ्यावी.
C)महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/दीपस्तंभ/खतीब
D)Atlas-student atlas oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन (यापैकी कोणतेही एक)यातील प्रश्नांचा खूप सराव करा.संकल्पना समजल्या शिवाय पुढे जाऊ नका.
3) अर्थशास्त्र–
A) शालेय पाठ्यपुस्तक 10th ,11th ,12th
B) अर्थशास्त्र-रंजन कोळंबे
C) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2019-20
D) अर्थशास्त्र Part 2-किरण देसले Part 2(सर्व शासकीय योजना करून घ्याव्यात)
4) विज्ञान-
जुनी व नवीन शालेय पाठ्यपुस्तक 5th ते 10th (80% प्रश्न या पुस्तकातून येतात.परंतु आपण ते काळजीपूर्वक वाचत नाही.आपण फक्त पुस्तके वाचून संपवण्यावर भर देतो.)
NCERT- 8th,9th,10th (नाही वाचली तरी चालतात)
सामान्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/कोलते प्रकाशन/(कोणतेही एक ) तुम्हाला ज्यातून वाचायला सोपे वाटते ते पुस्तक घ्या.पाठांतर करावे लागते.प्रश्नाचे स्वरूप तसे आहे.
ज्यांना इंगजीमधून शक्य आहे त्यांनी Lucent General Science केले तरी उत्तम आहे 5) राज्यव्यवस्था आणि पंचायतराज
A) शालेय पाठ्यपुस्तक 11th, 12th
B) Indian Polity-Laxmikant(वाचायला हवे.मुख्य परीक्षेत खूप प्रश्न यातून आले होते..मराठी मध्ये पण उपलब्ध आहे. )
C)भारतीय राज्यव्यवस्था-रंजन कोळंबे/तुकाराम जाधव(यापैकी कोणतेही एक)
D)पंचायती राज- प्रशांत कदम
6) पर्यावरण-
A) शालेय पाठ्यपुस्तक 11th, 12th
B) पर्यावरण -तुषार घोरपडे,युनिक प्रकाशन
C) Shankar IAS नोट्स(इंग्लिश मध्ये आहे,जमले तर वाचासोबत पर्यावरण विषयक चालू घडामोडी करा.त्यावर खूप प्रश्न पडतात.
7) चालू घडामोडी
B) मासिक :- लोकराज्य /परिक्रमा/
C) सकाळ पेपर वार्षिकी (For Revision )
महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व जुनी व नवीन शालेय पुस्तके
PDF स्वरूपात खालील लिंक वर जाऊन मिळवा
इयत्ता ११ वी चे नवीन इतिहासाचे पुस्तक
पेपर 2: CSAT
A)उतारे: सर्वप्रथम आयोगाच्या मागील पेपर मधील उतारे सोडवावेत . नंतर बाजारात उपलब्ध
कोणताही चांगला CSAT सराव संच घेऊन त्त्यात passage कसे सोडवायचे त्याच्या tricks पहा.
यातून दररोज 4 passage सोडवायचे.आपण कोठे चुकतो त्या लिहून काढायच्या आणि त्या दुरुस्त करायच्या.मागील प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत त्याचे analysis करा.यातील बुद्धिमत्ता आणि अंकगणित चे मागील प्रश्न पहा. याचा व्यवस्थित सराव केल्यास confidence आल्यावर इतर काही करण्याची गरज नाही.
B)अंकगणित : इंग्रजीमधील R S Agrrawal केले तर अतिउत्तम
किंवा मराठी मधील अभिनव प्रकाशन
C) बुद्धिमत्ता : इंग्रजीमधील R S Aggrawal Verbal Non verbal
किंवा मराठीमध्ये अभिनव प्रकाशन
टिप ; बाजारात उपलब्ध विविध क्लासेसच्या कमीत कमी 30 सराव पेपर सोडवावेत .
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पुस्तक सूची साठी येथे जा
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा