Breaking

Search this Blog

28 March 2021

MPSC Mains Booklist by DySP Sham Panegaonkar & DySP Arvind Raibole

 राज्यसेवा मुख्य परीक्षा Booklist 

 - श्री शाम पानेगावकर (DySP -2019 ,ASO- 2018) 

श्री अरविंद रायबोले  (DySP -2019 ,STI- 2018) 

* ही माझी booklist आहे , ती परिपूर्ण आहे असे नाही . आपल्या सोयी नुसार यात बदल करू शकता.

* यशस्वी उमेदवारांची booklist बघितली तर लक्षात येईल की त्यातील बरीचशी पुस्तकं Common आहेत. 3 यशस्वी उमेदवारांची Booklist बघून आपली स्वतःची बुकलिस्ट ठरवू शकता . पुढे त्यात अधिक बदल करायची गरज पडणार नाही . 



●मराठी

1. सुगम मराठी व्याकरण व लिखाण - मो. रा. वाळिंबे (लिखाणासाठीही उपयुक्त)

प्रश्न सरावासाठी लोकसेवा प्रकाशन चे प्रश्नपत्रिका पुस्तक वापरू शकता.

निबंध - इंटरनेट तसेच वृत्तपत्रे यातून चांगली सुभाषिते मिळवू शकता ती एका वहीत लिहून ठेवा

भाषांतर - आयोगाचे csat पेपर आहेत. . तर तुम्ही त्यातून उतारे भाषांतरित करून स्वतः तपासू शकता.

2. संपूर्ण मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे (revision साठी)


●English

1. English Grammar and composition - pal & suri ( Essay Writing , Summery writing साठीही उपयुक्त )

शब्द संग्रहासाठी बक्षी चे पुस्तक ही उपयुक्त आहे.

2. Balasaheb shinde ( for revision ) 


*या दोन्ही विषयात मार्क मिळवण्यासाठी सराव खूप उपयुक्त आहे.


सामान्य अध्ययन 1

------------------------

इतिहास

1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर- सिलॅबस नुसार घटक

2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - साहेबराव गाठाळ (मेन्स साठी चे पुस्तक)

3. आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) - समाधान महाजन 

यात सर्व syllabus pointwise कव्हर केला आहे. हिस्टरी विषयात मार्क घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची पुस्तके उपयुक्त

समाज सुधारक - ज्ञानदीप प्रकाशन , ११ वी इतिहास (जूने पुस्तक)

4. स्वातंत्र्योत्तर भारत - प्रधानमंत्री सीरियल तसेच बिपिन चंद्रा यांचे पुस्तक


●भूगोल व कृषी

1) भूगोल व कृषि - सवदी (pointwise आहे)

2) महाराष्ट्राचा भूगोल -  दीपस्तंभ 

3) कृषि - रंजन कोळंबे + 11 वी , 12 वी पाठ्यपुस्तक (selective according to syllabus ) 

4) पर्यावरण - तुषार घोरपडे (selective according to syllabus ) 

* पर्यावरण आणि सुदूर संवेदन या घटकांसाठी करंट चा touch आवश्यक आहे 

सुदूर संवेदन - ११ वी ncert तसेच ज्ञानदीप प्रकाशन चे भूगोल पुस्तकात हा टॉपिक चांगला दिलेला आहे.


सामान्य अध्ययन 2

------------------------

1) इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत

2) आपले संविधान - ज्ञानदीप (very useful for revision )

3) भारतीय संविधान व राजकारण भाग 2 ( Unique  अलीकडे uniqe वाल्यांनी दोन्हीचा मिळून एकच भाग केला आहे त्यामुळे sullabus नुसार वाचा)

4) पंचायतराज - रंजन कोळंबे / किशोर लवटे

5) कायदे - ज्ञानेश्वर पाटील ( यात कायदे सुटसुटीत आहेत सहज समजतात. मात्र उपकलमे नाहीत. ते unique भाग 2 या पुस्तकातून details cover करावे .)

Bare act चा वापर केल्यास गुणांची खात्री मिळते.


सामान्य अध्ययन 3

  -----------------------

1) मानव संसाधन विकास व मानवी हक्क - रंजन कोळंबे 

2) मानव संसाधन विकास व मानवी हक्क - Success Academy (Comprehensive Book with previous questions analysis )

3) किरण देसले भाग 2 ( development)

* या विषयाला current touch आवश्यक आहे.

विविध योजना शासकीय वेब साईट वरून पहाव्यात.


सामान्य अध्ययन 4

------------------------

● *अर्थशास्त्र*

1. भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे

2. किरण देसले भाग 1( यातून कृषी अर्थव्यवस्थेचा भाग पण बराचसा भाग कव्हर होतो) 

3. कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र- महेश गरगोटे ( GS 1 मधील कृषी घटक सुद्धा यातून चांगले cover होतात. ) 


 ● विज्ञान व तंत्रज्ञान

1) विज्ञान व तंत्रज्ञान - रंजन कोळंबे ( selective according to syllabus - very useful)

2) Biotechnology - दीपस्तंभ

आपत्ती व्यवस्थापन आणि संगणक- जोगळेकर

* या विषयाला विज्ञान विषयक चालू घडामोडींचा touch आवश्यक आहे..


मेन्स अभ्यास करताना शॉर्ट नोट्स शेवटच्या काही दिवसात वाचायला खूप उपयुक्त ठरतात.

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा