Breaking

Search this Blog

31 August 2013

MPSC PSI-STI-ASO Combine Exam New Pattern & Syllabus 2020


MPSC PSI/STI/ASO Combine Exam New Pattern & Syllabus 
       
    MPSC द्वारे गट-ब(अराजपत्रित) पदांच्या भरतीसाठी वेगळी परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते .यामध्ये खालील तीन पदांचा समावेश होतो .

  •      1) STI (राज्य कर निरीक्षक) 
    हे पद वित्त विभागाच्या अंतर्गत असून महाराष्ट्रात साधारणपणे जिल्ह्याची ठिकाणी GST कार्यालयात यांची नेमणूक केली जाते .हे पद कार्यालयीन कामकाज व काही वेळा व्यवसाय तपासणी साठी जाणे अशा स्वरूपाचे आहे .पुढे या पदावर काही कालावधी पूर्ण झाल्यावर STO(State Tax Officer Gazetted) व पुढच्या पदांवर सहायक राज्यकर आयुक्त (ACST)बढती मिळते . सध्या मी मुबईत STI पदावर रुजू आहे.
  • 2)ASO (सहायक कक्ष अधिकारी)
    हे पद शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत असून यांची नेमणूक मुंबईस्थित मंत्रालयात विविध विभागात केली जाते .या पदाचे स्वरूप निव्वळ कार्यालयीन असून बाहेर फिल्डवर जायला किंवा बाहेर जिल्ह्यात बदली भेटत नाही .मुंबईत ज्यांची राहायची तयारी आहे त्यांच्यासाठी यापेक्षा दुसरा स्थिर पर्याय दुसरा नाही .राज्य माहिती आयोगाच्या जिल्हा ठिकाणच्या कार्यालयात बदली चा पर्याय यांच्यासाठी असतो .पुढे या पदावर सेवेचा ठराविक कालावधी पूर्ण झाल्यावर कक्ष अधिकारी(Gazetted) व पुढच्या पदांवर अवर सचिव(Under Secretary) बढती मिळते .
    वैशिष्ट्य = या पदावरून पुढच्या वरिष्ठ पदांवर फार लवकर बढती होते . पूर्वी मंत्रालयात मी ASO या पदावर रुजू होतो.

  • 3) PSI ( पोलीस उपनिरीक्षक)
    हे गृह विभागाच्या अखत्यारीतील पद असून यांची नियुक्ती महाराष्ट्रात कोठेही होते . ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेले हे पद आहे . MPSC च्या दुनियेत या PSI पदाचे एक वेगळे आकर्षण 
    विद्यार्थ्यांमध्ये आहे यावर निवड होण्यासाठी प्रयत्न करणारा एक वेगळा विद्यार्थी वर्ग पाहायला मिळतो.
    ठराविक कालावधीच्या सेवेनंतर सहायक पोलीस निरीक्षक(API) व नंतर पोलीस निरीक्षक(PI) पदांवर बढती मिळते.



  • वेतन: वरील तिन्ही पदांना शहराच्या प्रकारानुसार ७ व्या वेतन आयोगानुसार S14 वेतनश्रेणी लागू असून , त्यानुसार सरासरी ५५ ते ६० हजार रुपयांपर्यंत पगार दरमहा मिळतो.
    सध्या शासनाची नवी पेन्शन योजना (NPS) लागू आहे.


  • पदसंख्या : दरवर्षी उपलब्ध पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात येत असते. त्यामुळे एकूण पदे, त्यामध्ये आपल्या संवर्गामध्ये उपलब्ध पदे असे हिशोब न करता परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम नेमकेपणाने समजून घेऊ.





                                     Download  In PDF


दुय्यम सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप :100 गुण , वेळ :  1 तास

  • अभ्यासक्रम 
.     चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

.     नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यासराज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

.     आधुनिक भारताचा विशेषतमहाराष्ट्राचा इतिहास 

.     भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वीजगातील विभागहवामानअक्षांश-रेखांशमहाराष्ट्रातील जमिनीचे प्रकारपर्जन्यमानप्रमुख पिशहरेनद्याउद्योगधंदे इत्यादी.

.     अर्थव्यवस्था –

भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्नशेतीउद्योगपरकीय व्यापारबँकिंगलोकसंख्यादारिद्रय़  बेरोजगारीमुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्पलेखालेखापरीक्षण .

.     सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुऑलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).

.     बुद्धिमापन चाचणी  अंकगणित.

बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

अंकगणित – बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकारदशांशअपूर्णाक  टक्केवारी.


 गुणांकन 

(0.25 गुण एका चुकीच्या उत्तरामागे वजा केले जातात )
या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातातआणि प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतातभरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा नक्की करण्यात येतेया सीमारेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.

काठिण्य पातळी
राज्यसेवादुय्यम सेवा किंवा गट  सेवा परीक्षा कोणतीही असो तिचा दर्जा आयोगाने जाहिरातीमध्ये नमूद केलेला असतोहा नमूद दर्जा म्हणजे त्या त्या परीक्षेची काठिण्य पातळी असे सर्वसाधारण गृहीतक असतेमात्र राज्यसेवा आणि दुय्यम सेवांची काठिण्य पातळी ही पदवीच्या दर्जाची निश्चित करण्यात आली आहेमग या दोन परीक्षांमधील काठिण्य पातळी वेगळी की समानचहे समजून घेण्याआधी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहेराज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमधील ज्या पदांसाठी या परीक्षा घेतल्या जातात ती पदे गट  (वर्ग ,,अशी उतरंड असलेल्या प्रशासकीय रचनेचा भाग आहेतप्रत्येक पातळीवरील पदांसाठी प्रशासकीय जबाबदारी आणि कामाचे स्वरूप वेगवेगळे आणि निश्चित केलेले असतेत्या त्या जबाबदाऱ्या निभावू शकणारे अधिकारी / कर्मचारी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून निवडण्यात येतातआणि त्या अनुषंगाने त्या त्या स्तरावरील पदांच्या परीक्षांची काठिण्य पातळी  स्वरूप निश्चित केलेले असते.

दुय्यम सेवेसाठीच्या प्रश्नांचा दर्जा राज्यसेवेप्रमाणेच पदवीचा असला तरी तो अभ्यासक्रमाच्या आकलनाचा भाग झालाराज्यसेवेची काठिण्य पातळी ही बहुविधानी प्रश्नांमुळे वरच्या स्तरावर असतेतसेच पर्याय हे जास्त नेमकी माहिती विचारणारेएकसारखे वाटल्याने संभ्रम वाढवू शकतील असे असतातदुय्यम सेवेमध्येही बहुविधानी प्रश्न असले तरी ते संभ्रमात टाकणारे कमी असतात आणि नेमके (to the point) असल्याने त्यांच्यातून योग्य पर्याय शोधणे तुलनेने कमी कष्टाचे ठरते.

काठिण्य पातळीबाबत एकदा स्पष्टता आली कीतिचा फारसा विचार  करता जास्तीत जास्त बारकाईने पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन अभ्यास करणे जास्त व्यवहार्य आहेयातून संकल्पना स्पष्ट होण्यासनेमका अभ्यास होण्यास आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास खूप मदत होतेही स्पष्टता सर्वच परीक्षा आणि सर्वच मुलाखतींसाठी  प्रशासनात  फायदेशीर ठरते.


MPSC Grp B Prelim & Mains Book List 






PSI-STI-ASO गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची 



I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -

१. 11 वी इतिहास क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SY BA {HIS 220}
चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )


II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी जुनी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी ( Physical India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
४. महाराष्ट्र भूगोल - सवदी
५. Oxford किंवा नवनीत ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. 11,12 वी राज्यशास्त्र - महाराष्ट्र
२. भारतीय राज्यव्यवस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
३. पंचायत राज - प्रशांत कदम


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. 11,12 वी क्रमिक,NCERT - 11वी
२. Mrunal.org चे videos on Economy बघण्यासाठी या लिंक वर जा
३. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे
४.आर्थिक पाहणी - महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics 

V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी जुनी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science


VI. गणित & बुद्धिमत्ता
१. RS अग्रवाल किंवा अभिनव प्रकाशन
२. Youtube Video(Study IQ ,exam race, Mahendra Guru ,etc) 

VII. चालू घडामोडी
१. सकाळ + महाराष्ट टाइम्स वृत्तपत्र
२. परिक्रमा मासिक 

VII. Revision साठी स्वतःच्या नोट्स वापरा




MPSC Grp B Mains 2020 Book List

PSI-STI-ASO गट ब मुख्य परीक्षा - संदर्भ पुस्तक सूची


पेपर 1 : भाषा व सामान्य ज्ञान (तिन्ही पदांसाठी सामाईक असतो)


अ ) मराठी : 1) मराठी व्याकरण : मो. रा. वाळिंबे व बाळासाहेब शिंदे (सराव )
                    2) शब्दसंग्रह - (दीपस्तंभ/केसागर )
                    3) सरावासाठी मागील प्रश्नपत्रिका बारकाईने सोडवा


ब ) इंग्रजी : 1) Grammar : पाल आणि सुरी /balasaheb shinde
                    2) Spotting Error : पाल आणि सुरी / objective english ,S P बक्षी अरिहंत
                    3) Vocabulary : Antonym/Synonyms= पाल आणि सुरी
                            One word/Idiom/Phrases/Spelling/etc = Objective English ,S P बक्षी अरिहंत 
                     4) For Practice : Solve MCQ from पाल आणि सुरी / other from ,S P बक्षी अरिहंत
                        YOUTUBE VIDEOs From Study IQ/Mahendra Guru


क ) सामान्य ज्ञान : 1)चालू घडामोडी : दै. सकाळ व परिक्रमा मासिक
                                2) माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क कायदा (यशदा )
                                3) संगणक व माहिती तंत्रज्ञान : धीरज चव्हाण नोट्स Download




पेपर 2 :सामान्य क्षमता चाचणी (सामाईक घटक )


तिन्ही मुख्य परीक्षामधील सामाईक घटक : 1)इतिहास
                                                                 2)भूगोल
                                                                 3)राज्यघटना
                                                                 4)बुद्धिमत्ता चाचणी



1. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी )

१. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे किंवा गाठाळ
२. YCMOU SY BA {HIS 220}चे पुस्तक
३. 11 वी इतिहास ( क्रमिक पुस्तके महाराष्ट्र )Download

2. भूगोल ( Scoring विषय आहे )
१. 5 वी ते 12 वी जुनी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र )Download
२. NCERT 11 वी - Physical India
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब / सवदी (दोन्ही वाचा )४. नवनीत किंवा सवदी ATLAS

3. राज्यघटना ( Scoring विषय आहे )

१. 11 वी व 12 वी राज्यशास्त्र क्रमिक पुस्तके (महाराष्ट्र)Download
२. भारतीय राज्यव्यवस्था - लक्ष्मीकांत
३. भारतीय राज्यघटना -कोळंबे (रिविजन साठी वापरा )
३. पंचायत राज - प्रशांत कदम


4. बुद्धिमत्ता चाचणी
१. RS अग्रवाल किंवा अभिनव प्रकाशन
२. Youtube Video (Study IQ ,Exam race, Mahendra Guru ,etc)



पेपर 2 : पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान


STI मुख्य परीक्षा


अर्थव्यवस्था ( Concept क्लिअर असतील तरच Scoring ) 

1. महाराष्ट्र 11 वी व 12 वी चे क्रमिक व NCERT चे 11वी चे पुस्तक Download
2. मृणाल चे Videos on Economy :85 Lecture to watch Click Here
3. अर्थशास्त्र - रंजन कोळंबे (पूर्ण वाचा ) व
हे 3 घटक :- पायाभूत सुविधा /आर्थिक सुधारणा /आंतरराष्ट्रीय व्यापार-संस्था : किरण देसले मधून करा
4. आर्थिक पाहणी - महाराष्ट्र
5. प्रतियोगीता दर्पण - Economics Special Issue
6. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा (40% प्रश्न Repeat )
7. प्रश्नसंच: दीपस्तंभ चा अर्थशास्त्र प्रश्नसंच सोडवा






ASO मुख्य परीक्षा

राज्यव्यवस्था व प्रशासन 

1. 11 वी व 12 वी राज्यशास्त्र क्रमिक पुस्तके (महाराष्ट्र)Download
2. भारतीय राज्यव्यवस्था - लक्ष्मीकांत
3. भारतीय राज्यघटना -कोळंबे
4. पंचायत राज - प्रशांत कदम
5. नियोजन घटक : रंजन कोळंबे अर्थशास्त्र
6. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा (40% प्रश्न Repeat )
7. प्रश्नसंच: भगीरथ प्रकाशन चा प्रश्नसंच सोडवा



PSI मुख्य परीक्षा

1. मानवी हक्क : रंजन कोळंबे
2. कायद्यांसाठी : किशोर लवटे


IMP: Revision साठी स्वतःच्या नोट्स वापरा

मित्रांनो , लक्षात घ्या हि पुस्तकांची परीक्षा नाही. जास्तीत जास्त पुस्तके वाचत बसण्यापेक्षा फक्त एकाच पुस्तकाला सतत Revision करणे हाच खरा यशाचा मंत्र आहे
- धीरज चव्हाण

STI 2018,Open Category मध्ये 1 ला क्रमांक ,
ASO 2018 , 29 वा क्रमांक,
PSI 2014,2016,2017,2018 Ground

6 comments:

  1. Sir I am preparing for the PSI examinations. Can you please send me the direct link to download the MPSC Syllabus for the upcoming PSI examination of the year 2018.

    ReplyDelete
  2. Sir please send mpsc STI syllabus 2018

    E. Mail .. 967337pravin@gmail.com

    ReplyDelete
  3. Hello Sir.. Please mention the MPSC PSI results dates. Waiting for this exam results.

    ReplyDelete
  4. UP Metro Rail has now released the LMRC Syllabus 2020 for 183 vacant positions. candidates who successfully fill the form before the last date will now bale to get the full syllabus. Syllabus will also able to download in PDF also. The examination will be conducted for Assistant Manager & Junior Engineer Jobs.

    ReplyDelete
  5. M a women, nd m 1st time given the exam of STI, plz me suggestiosuggestion give

    ReplyDelete
  6. Sir I am preparing mpsc examination so can u please direct send syllabus for upcoming ASO exam 2020 .

    ReplyDelete

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा