🔰संयुक्त सेवा पूर्व परीक्षा तयारी कशी करावी?
मित्रांनो प्रथम राज्यसेवा पूर्व 2021 चा GS च्या पेपरचा बारकाईने अभ्यास करा.त्यावरून दिसून येईल की आयोगाने पेपर पॅटर्न पूर्वीसारखा अवघड करून ठेवलाय.
त्यामुळे येत्या 4 September च्या Combine Prelim साठी तयारी कशी करावी हा प्रश्न तुमच्या समोर आहे.
त्याचे माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो.
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये पॅटर्न बदललेला जरी दिसत असला तरी 100 पैकी 50-60 प्रश्न हे चांगला अभ्यास करणाऱ्याला सुटण्यासारखे नक्कीच होते हे बघा.
2)त्यामुळे जे आपल्याला जे येते त्यावरच अधिक लक्ष द्या आणि राज्यसेवेत ज्या चुका झाल्या ते टॉपिक परत Revise करा .
3) चालू घडामोडी: या विषयाचा आवाका फार वाढलेला आहे.मागे यावर मी लिहिले आहे.पुन्हा एकदा सांगतो की हा विषय सुद्धा टॉपिक नुसार करा. 2020 व 2021 ची एयरबुक फक्त करा.
जे Risk घेऊ इच्छितात त्यांनी मार्च 2019 ते ऑगस्ट 20 पर्यंतचे चालू घडामोडी अभ्यासा.
तसेही आयोगाचा कल मागच्या घडामोडी विचारण्यावर जास्त असतो.
सकाळ एयरबुक उत्तम आहे.
4)इतिहासाला कमी वेळ द्या. समाजसुधारक व इतर घटना(ठोकळ्यातील)एकदा वाचा.
5)भूगोल,राज्यघटना व पंचायतराज ,अर्थव्यवस्था,विज्ञान हे विषय बारकाईने अभ्यासा.
विज्ञान आहे तीच पुस्तके वाचा.नवीन वाचण्याच्या भानगडीत कृपया पडू नये ही विनंती.
भूगोल साठी खतीब च्या पुस्तकांमधून सर्व जिल्हे ,खनिज संपत्ती व खडक रचना हे टॉपिक करून घ्या.
6) अर्थव्यवस्था: फक्त कोळंबे सर वाचा
7)बुद्धिमत्ता व अंकगणित: हा विषयच तुम्हांला मुख्य परिक्षेला घेऊन जातो हे लक्षात ठेवा. बुद्धिमत्ता सर्वजण करतात.पण अंकगणित बऱ्याच जणांना जमत नाही.
किमान त्यांनी सरासरी,शेकडेवारी,काळ काम वेग,व्याज असे सोपे टॉपिक करून ठेवा. यात कमीत कमी 9-10 मार्क आणायचा प्रयत्न करा.त्याशिवाय तुम्ही पूर्व पास नाही होऊ शकत.
8) 20 सराव पेपर तरी किमान सोडवा.
वेळेच्या नियोजनासाठी आवश्यक आहे.
ज्यांना परीक्षा जवळ आल्यावर किंवा पेपर सोडवताना भीती किंवा दडपण येते त्यांना खूप आवश्यक आहे. एकदा करून बघा. परीक्षेत तुम्हाला खूप फायदा होईल.
सकारात्मक वातावरणात राहा. राज्यसेवेच्या Cutoff च्या चर्चेत भाग घेऊ नका.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा💐💐💐
-धीरज चव्हाण सर
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा