MPSC च्या तयारीला लागलेल्या नवीन विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल.
चला तर जाणून घेऊ या.
MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग....
या आयोगाद्वारे राज्य शासनातील गट अ ,ब ,क या तिन्ही स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दरवर्षी स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले जाते.यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी आपले नशीब आजमावत.
✍ MPSC द्वारे खालील सेवांतील अधिकारी-कर्मचारी निवाडीकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते
✍ - राज्यसेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
✍- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा(AMVI)
✍ - संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)
✍- संयुक्त गट क परीक्षा (Tax Asst-Clerk-Excise SI)
वरीलपैकी खालील 3 परीक्षेसाठी कोणत्याही पदविशाखेचा उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र असतो.म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खालील परीक्षा देण्याकडे सर्वसामान्य कल दिसतो.
1) MPSC राज्यसेवा परीक्षा (Dy Collector, तहसीलदार, Dysp इ.)
2) संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)
3) संयुक्त गट क परीक्षा (Clerk-Tax Asst-Excise SI)
वरील परीक्षांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ.
1) MPSC राज्यसेवा परीक्षा(Dy Collector, तहसीलदार, Dysp इ.)
राज्यशासनातील गट अ व गट ब (राजपत्रित) पदांच्या भरतीसाठी या परीक्षेचे दरवर्षी आयोजन केले जाते)
राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदे
✍- उपजिल्हाधिकारी (गट अ)
✍ - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
✍- साहाय्यक राज्यकर आयुक्त (गट अ)
✍- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
✍- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
✍ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
✍- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
✍- तहसीलदार (गट अ)
✍- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
✍- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
✍- कक्ष अधिकारी (गट ब)
✍- गटविकास अधिकारी (गट ब)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
✍- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
✍- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
✍- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
✍- नायब तहसीलदार (गट ब)
जाहिरात- दरवर्षी डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते.
https://www.mpsc.gov.in या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.
अर्ज करण्यासाठी : खालील साईट वरती जाऊन प्रथम आपली प्रोफाईल तयार करावी.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
MPSC परीक्षेला अर्ज करण्यासाठी नवीन प्रोफाइल कशी तयार कराल ?
* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक.
* वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.
* शारीरिक पात्रता -
१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता :-
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता :-
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .
महिला उमेदवारांकरिता :-
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .
परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 3 टप्प्यात घेतली जाते.
1)पूर्वपरीक्षा : 2 पेपर ,एकूण 400 गुण (एप्रिल मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 6 पेपर ,एकूण 800 गुण(जुलै किंवा ऑगस्ट)
3)मुलाखत : 100 गुण (डिसेंबर किंवा जानेवारी)
MPSC Rajyaseva 2021 Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची
पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.
अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परीक्षा व मुलाखतीचे एकूण गुण गृहीत धरले जातात.
मुलाखतीस पात्र होण्यासाठी जाहिरातीत नमूद पदांच्या 3 पट विद्यार्थी निवडले जातात.
परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.
2) COMBINE किंवा संयुक्त गट ब परीक्षा (PSI-STI-ASO)
राज्यशासनातील PSI-STI-ASO या तीन अराजपत्रित पदांच्या निवडीसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.पूर्वी या प्रत्येक पदांसाठी वेगळी परीक्षा होत असे. पण सन 2017 पासून यात बदल होऊन या तिन्ही पदांची पूर्वपरीक्षा एकत्र होत आहे.
- PSI-पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस दलातील पद असून याबद्दल वर्दीमुळे विद्यार्थ्यांना जास्त आकर्षण आहे.नियुक्ती कोणत्याही पोलीस स्टेशनला सर्व राज्याभरात कुठेही मिळू शकते.
- STI- राज्य कर निरीक्षक : हे GST विभागातील पद असून या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा पाहावयास मिळते.नियुक्ती जिल्ह्याची ठिकाणी सर्व राज्यभरात कुठेही मिळू शकते.
- ASO- सहायक कक्ष अधिकारी : मंत्रालयीन संवर्गातील हे पद असून मंत्रालय ,मुंबई येथेच कायमची नियुक्ती असल्याने विद्यार्थ्यांत या पदाचे जरा कमी आकर्षण आहे.
जाहिरात- दरवर्षी मार्च च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते. https://www.mpsc.gov.in/1035/Home या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.
परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 3 टप्प्यात घेतली जाते.
फक्त PSI साठीच शारीरिक चाचणी व मुलाखतीचे आयोजन केले जाते,बाकीच्या पदांसाठी नाही.
STI आणि ASO साठी खालील क्रमांक 1 आणि 2 टप्पेच अंतर्भूत आहेत
1)पूर्वपरीक्षा : 1 पेपर ,एकूण 100 गुण (परीक्षा मे मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 2 पेपर ,एकूण 400 गुण (ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर)
3)फक्त PSI साठी मुलाखत (40 गुण)व शारीरिक चाचणी(100 गुण )- (डिसेंबर किंवा जानेवारी)
तिन्ही पदांसाठी संयुक्तरित्या एकाच पूर्वपरीक्षेचे आयोजन केले जाते.
पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.
" संयुक्त गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची
वरील प्रत्येक पदाची मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 (भाषा व GK) ,200 गुण :हा तिन्ही पदांसाठी संयुक्त आहे.
तर पेपर क्रमांक 2 (पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान),200 गुण: हा तिन्ही पदांसाठी स्वतंत्र आहे.
STI व ASO च्या अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परिक्षेचेच एकूण गुण गृहीत धरतात.
PSI साठी मुलाखत व शारीरिक चाचणी व मुख्य परीक्षेचे एकूण गुण गृहीत धरले जातात.
PSI च्या शारीरिक चाचणी व मुलाखतीला पात्र होण्यासाठी मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे एकूण जाहिरातीत नमूद पदांच्या 3 पट उमेदवार निवडले जातात.
परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.
3) संयुक्त गट क परीक्षा (Tax Asst-Clerk-Excise SI)
राज्यशासनातील Tax Asst-Clerk-Excise SI या तीन गट क पदांच्या निवडीसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.पूर्वी या प्रत्येक पदांसाठी वेगळी परीक्षा होत असे. पण सन 2017 पासून यात बदल होऊन या तिन्ही पदांची पूर्वपरीक्षा एकत्र होत आहे.
Excise SI -दुय्यम निरीक्षक हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील पद असून वर्दीमुळे याबद्दल विद्यार्थ्यांना जास्त आकर्षण आहे.नियुक्ती कोणत्याही उत्पादन शुल्क विघागत राज्यभरात कुठेही मिळू शकते.
Tax Asst- कर निरीक्षक : हे GST विभागातील पद असून या पदासाठी सर्वात जास्त स्पर्धा पाहावयास मिळते.नियुक्ती जिल्ह्याची ठिकाणी सर्व राज्यभरात कुठेही मिळू शकते.
Clerk- लिपिक : मंत्रालयीन संवर्गातील हे पद असून ,मंत्रालय ,मुंबई येथेच कायमची नियुक्ती असल्याने विद्यार्थ्यांत या पदाचे जरा कमी आकर्षण आहे.
जाहिरात- दरवर्षी एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात ही जाहिरात येते. https://www.mpsc.gov.in/1035/Home या अधिकृत साईटवर जाऊन आपण ती बघू शकता.
परीक्षा पद्धत: ही परीक्षा खालीलप्रमाणे 2 टप्प्यात घेतली जाते.
1)पूर्वपरीक्षा : 1 पेपर ,एकूण 100 गुण (परीक्षा साधारण जून मध्ये होते)
2)मुख्य परीक्षा : 2 पेपर ,एकूण 200 गुण (सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर)
तिन्ही पदांसाठी संयुक्तरित्या एकाच पूर्वपरीक्षेचे आयोजन केले जाते.
पूर्वपरीक्षा ही पात्रता स्वरूपाची असून ,तिच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो.साधारण जाहिरातीत नमूद पदांच्या 8-10 पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेस पात्र होतात.
वरील प्रत्येक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात. त्यापैकी पेपर क्रमांक 1 (भाषा व GK) ,100 गुण :हा तिन्ही पदांसाठी संयुक्त आहे.
तर पेपर क्रमांक 2 (पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान),100 गुण: हा तिन्ही पदांसाठी स्वतंत्र आहे.
अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्यासाठी मुख्य परिक्षेचेच एकूण गुण गृहीत धरतात.
" संयुक्त गट क संयुक्त पूर्व परीक्षा - पुस्तक संदर्भसूची
परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो.
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा