Breaking

Search this Blog

18 December 2020

MPSC COMBINE PRELIM FOR FOREST,AGRICULTURE AND ENGINEERING SERVICES EXAM | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा वनसेवा,कृषी सेवा व अभियांत्रिकी सेवा यांसाठी इथून पुढे एकच पूर्व परीक्षा

🔰महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
वनसेवा,कृषीसेवा व अभियांत्रिकी सेवा यांसाठी इथून पुढे एकच पूर्व परीक्षा असेल.
2021 पासून हा निर्णय लागू होईल.


अशी होणार नवी परीक्षा

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किंवा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील. त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी एमपीएससीकडून प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जाईल.
 

 

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा