QUE & ANS- SET- A - 1 TO 200
1. पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातकोणत्या शहरात पार पडले ?
A. मुंबई B. आळंदी C. सांगली D. नाशीक
Answer D. नाशीक
2. पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ____ यांची तरस्वागताध्यक्ष पदी ___ होते
A. छगन भुजबळ , डॉ. सदानंद मोरे B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ
C. वसंत आबाजी डहाके , पृथ्वीराज चव्हाण D. डॉ. सदानंद मोरे , वसंतआबाजी डहाके
Answer B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ
3. डॉ. आंबेडकरांचे स्मारक दादर चैत्यभूमी जवळील ______________ च्या जागेवरहोण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आणि भारताच्या पंतप्रधानांनी तत्वतः मान्यता दिलीआहे .
A. कोहीनूर मिल B. इंदू मिल C. फिनीक्स मिल D. श्रीनिवास मिल
Answer B. इंदू मिल
4. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन ( JNNURM ) योजनेसाठीसन 2010 वर्षाकरीता महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले ?
A. तीन B. पाच C. दहा D. वीस
Answer B. पाच
5. राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कारांमध्ये _________ ला राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्याक्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .
A. पनवेल नगरपालीका ( जि. रायगड ) B. नवी मुंबई नगरपालीका
C. अमरावती नगरपालीका D. मलकापूर नगरपंचायत ( जि.सातारा )
Answer D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )
6. राष्ट्रीय स्तरावरचा दुसर्या क्रमांकाचा राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कार______________ ला प्रदान करण्यात आला .
A. अमरावती महानगरपालिका B. पिंपरी चिंचवड महानगरपालिका C. मुंबई महानगरपालिका D. नागपूरमहानगरपालिका
Answer A. अमरावती महानगरपालिका
7. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ' जागतिक आर्थिक परिषद ' नोव्हेंबर 2011 मध्येकोठे पार पडली ?
A. मुंबई B. पुणे C. बेंगलोर D. दिल्ली
Answer A. मुंबई
8. अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणांवरमहानगरपालिका स्थापण्यास मंजूरी दिली आहे ? ( निकष : तीन लाखांपेक्षा जास्तलोकसंख्या )
A. लातूर , निफाड B. लातूर , चंद्रपूर C. बुलढाणा ,चंद्रपूर D. बुलढाणा , लातूर
Answer B. लातूर , चंद्रपूर
9. राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी किती विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णयघेण्यात आला आहे ?
A. दोन B. सहा C. पंचवीस D. साठ
Answer B. सहा
स्पष्टीकरण : प्रत्येक महसूल विभागात एक याप्रकारे 6 विशेष न्यायालये उभारली जाणार .
10. 1 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांचे मानधन किती आहे ?
A. 800 रु. दरमहा B. 2000 रु. दरमहा C. 3000 रु. दरमहा D. 5000 रु. दरमहा
Answer C. 3000 रु. दरमहा
स्पष्टीकरण : 1 जानेवारी 2012 पासून पूर्वीच्या 800 रु.प्रतिमहा इतक्या मानधनातसुधारणा करून ते आता 3000 रु.प्रतिमहा दिले जाईल असा निर्णय झाला आहे .
11. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?
A. रा. गो. भांडारकर B. न्यायमुर्ती रानडे C. लोकमान्य टिळक D.सुधारक गो. ग. आगरकर
Answer B. न्यायमुर्ती रानडे
12.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?
A. गोपाळ गणेश आगरकर B. लोकमान्य टिळक C. न्यायमुर्ती रानडे D.महात्मा फुले
Answer B. लोकमान्य टिळक
13. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियतामिळाली होती ?
A. बालगंधर्व B. कुमारगंधर्व C. सवाईगंधर्व D. राजगंधर्व
Answer A. बालगंधर्व.
14. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्याकोणत्या भागात सुरु केली होती ?
A. वेताळ पेठ B. रास्ता पेठ C. रविवार पेठ D. बुधवार पेठ
Answer D. बुधवार पेठ
15. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनीदेण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर B. विठ्ठल रामजी शिंदे C. छत्रपती शाहूमहाराज D. कर्मवीर भाऊराव पाटील
Answer C. छत्रपती शाहू महाराज
16. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणेपरखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?
A. महात्मा फुले B. महर्षी वि. रा. शिंदे C. महर्षी धों. के. कर्वे D.रघुनाथ धों. कर्वे
Answer D. रघुनाथ धों. कर्वे
17. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?
A. विनोबा भावे B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन C. डॉ. पंजाबरावदेशमुख D. अच्युतराव पटवर्धन
Answer B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
18. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?
A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन B. डॉ. पंजाबराव देशमुख C. भाईबागल D. विनोबा भावे
Answer B. डॉ. पंजाबराव देशमुख
19. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?
A. अनुताई वाघ B. गोदावरी परुळेकर C. दुर्गाबाई भागवत D. प्रा. गं. बा. सरदार
Answer B. गोदावरी परुळेकर
20. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?
A. भाऊ दाजी लाड B. विष्णु बुवा ब्रम्हचारी C. न्यामुर्ती रानडे D. लोकहितवादी
Answer B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
21. पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते ?
A. 0 ते 60 सेंमी B. 15 ते 30 सेंमी C. 25 ते 40सेंमी D. 50 ते 100 सेंमी
Answer A. 0 ते 60 सेंमी
22.पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?
A. कॅल्शियम B. स्फुरद C. नत्रयुक्त D. पोटॅश
Answer C. नत्रयुक्त
23.कोणत्या पिकाची लवकर वेचणी किंवा कापणी करतात ?
A. कापूस B. बाजरी C. मोहरी D. करडई
Answer A. कापूस
24. हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले ?
A. 1965 B. 1968 C. 1974 D. 1978
Answer B. 1968
25. महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते ?
A. भुईमुग B. मका C. हरभरा D. तूर
Answer D. तूर
26. भारतीय शेतीचे वैशिष्टय कोणते ?
A. जमिनीची कमी उत्पादकता B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
C. जमीन जास्त व शेतमजूर कमी D. भारतीय जमीन कमी प्रतीची आहे
Answer B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
27. भात पिकासाठी आवश्यक सामू किती ?
A. 4 ते 6.5 B. 6 ते 7 C. 7.5 ते 8 D. 7.5 ते 8.5
Answer C. 7.5 ते 8
28. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात ?
A. सरी पद्धत B. गादी वाफे पद्धत C. सरी वरंबा पद्धत D.फड पद्धती
Answer D. फड पद्धती
29. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?
A. तांदूळ B. ज्वारी C. बाजरी D. गहू
Answer B. ज्वारी
30. खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?
A. भात B. तंबाखू C. गहू D. ऊस
Answer B. तंबाखू
31. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?
A. कला B. राजकारण C. समाजसेवा D. विज्ञान - तंत्रज्ञान
Answer C. समाजसेवा
32.ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
A. नेवासे B. देहू C. आळंदी D. पैठण
Answer C. आळंदी
33. " भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?
A. रमाबाई रानडे B. सरस्वतीबाई जोशी C. आनंदीबाईजोशी D. बाया कर्वे
Answer A. रमाबाई रानडे
34. ' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
A. रमाबाई रानडे B. पंडीता रमाबाई C. महर्षी कर्वे D. न्यायमूर्ती रानडे
Answer B. पंडीता रमाबाई
35. विधवाविवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्रीफडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला ?
A. जगन्नाथ शंकरशेठ B. बाळशास्त्री जांभेकर C. दादोबा पांडुरंग D. महात्माफुले
Answer B. बाळशास्त्री जांभेकर
36. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणार्या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली 'भारतरत्न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
A. आचार्य विनोबा भावे B. महर्षी धोंडो केशव कर्वे C. सेनापती बापट D. डॉ. अच्युतराव पटवर्धन
Answer A. आचार्य विनोबा भावे
37. ' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?
A. महात्मा गांधी B. विनोबा भावे C. सेनापती बापट D. जयप्रकाश नारायण
Answer B. विनोबा भावे
38. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?
A. शेरवली B. महाड C. रत्नागिरी D. महू (M.P)
answer D. महू (M.P)
39. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .
A. महू B. जमखिंडी C. मुरुड D. कागल
Answer D. कागल
40. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?
A. 1832 B. 1858 C. 1882 D. 1888
Answer C. 1882
41. क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते ?
A. आवळा B. काजू C. फणस D. आंबा
Answer A. आवळा
42.कोणत्या पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते ?
A. फवारा B. सरी-वरंबा C. कडा D. सारा
Answer D. सारा
43. खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्वाचा वाणकोणता ?
A. संकरित ज्वारी B. संकरित बाजरी C. गावराण ज्वारी D. संकरित गहू
Answer B. संकरित बाजरी
44. विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते .
कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .
A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .
Answer B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
45. गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते ?
A. 1% B. 7% C. 14% D. 22%
Answer D. 22%
46. ज्वारी पिकवाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता ?
A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा B. पोटरीअवस्था , प्ररागसिंचन ,दुधअवस्थां , उंडा
C. पोटरीअवस्था , दुधअवस्था , प्ररागसिंचन , उंडा D. दुधअवस्था , पोटरीअवस्था ,प्ररागसिंचन , उंडा
Answer A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा
47. पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणार्या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात ?
A. 60 किलो B. 80 किलो C. 80 किलो D. 120 किलो
Answer C. 80 किलो
48. नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी अंमलात आला ?
A. 26 जानेवारी 1975 B. 5 जून 1975 C. 26 जानेवारी 1976 D. 2 ऑक्टोबर 1976
Answer D. 2 ऑक्टोबर 1976
49. कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय ?
A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून B. कृषी उत्पन्नात वाढ व्हावीम्हणून
C. समानता यावी म्हणून D. ग्रामीण मागासलेपणा कमीव्हावा म्हणून
Answer A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून
50. हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात ?
A. ग्लिरिसिडीया B. हवाना C. अकेशिया D. कंपोस्ट
Answer ग्लिरिसिडीया
51.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?
A. स्वामी श्रद्धानंद B. स्वामी विवेकानंद C. स्वामी दयानंद सरस्वती D.अरविंद घोष
Answer A. स्वामी श्रद्धानंद
52.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?
A. अशफाकुल्लाखान B. रामप्रसाद बिस्मिल C. राजेंद्र लाहीरी D.चंद्रशेखर आझाद
Answer B. रामप्रसाद बिस्मिल
53.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?
A. बटुकेश्वर दत्त B. भगतसिंग C. राजगुरू D.जतींद्रनाथ दास
Answer B. भगतसिंग
54. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?
A. पंडीत नेहरू B. सरदार वल्लभभाई पटेल C. दादाभाईनौरोजी D. मोरारजी देसाई
Answer B. सरदार वल्लभभाई पटेल
55. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?
A. ग्रामसेवक B. तलाठी C. सरपंच D. पोलीस पाटील
Answer B. तलाठी
56. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?
A. महात्मा गांधी B. बलवंतराय मेहता C. सरदार पटेल D. पं.जवाहरलाल नेहरू
Answer D. पं. जवाहरलाल नेहरू
57. बिबीघर घटना कोठे घडली होती ?
A. लखनौ B. कानपूर C. मेरठ D. झाशी
Answer B. कानपूर
58. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?
A. मुंबई B. दिल्ली C. पुणे D. लाहोर
AnswerA. मुंबई
59. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
A. व्योमेशचंद्र बॅनर्जी B. फिरोजशहा मेहता C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी D.दादाभाई नौरोजी
Answer D. दादाभाई नौरोजी
50. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?
A. सी. एफ. अँड्रयुज B. चित्तरंजन दास C. अरविंद घोष D. सुभाषचंद्र बोस
Answer सी. एफ. अँड्रयुज
61. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला ?
A. 1982 B. 1992 C. 1998 D. 2001
nswer A. 1982
62.'उद्यमी हेल्पलाईन' केंद्रशासनाने कोणत्या उद्योगांच्या विकासासाठी सुरु केली आहे ?
A. मोठे अवजड उद्योग B. सूक्ष्म , लहान व मध्यम उद्योग
C. महिलांकडून चालविलेले उद्योग D. फक्त कृषी / जैव अभियांत्रिकी शी संबंधितउद्योग
Answer B. सूक्ष्म ,लहान व मध्यम उद्योग
63. एका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये ( EVM ) जास्तीत जास्त किती मते नोंदविलीजाऊ शकतात .
A. 2000 B. 2480 C. 3840 D. 10000
Answer C. 3840
64. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार सामान्य परिस्थितीतमतदान केंद्र तुमच्या घरापासून जास्तीत जास्त किती अंतरावर असू शकते ?
A. 1 किमी B. 2 किमी C. 3 किमी D. 4 किमी
Answer B. 2 किमी
65.13 जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्याप्रकारचा पोलीयो पूर्णपणे नामशेष झाला आहे ?
A. टाईप – 1 B. टाईप – 2 C. टाईप – 3 D. टाईप - 4
Answer A. टाईप - 1
66. आजच्या दिवसाचा(19 मार्च) विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचितजातींसाठी(SC) किती जागा राखीव आहेत
A. 60 B. 75 C. 84 D. 105
Answer C. 84
67. लोकसभेत सध्या अनुसूचित जमातींसाठी ( ST ) किती जागा राखीव आहेत ?
A. 60 B. 85 C. 107 D. 47
Answer D. 47
68. संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?
A. आज्ञावली ( Programs) साठी B. चित्रे ( Images ) व लिखितसाहीत्य
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता D. वरीलपैकी नाही
Answer C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता
69.' राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत ' फेब्रुवारी - मार्च 2012 या कालावधीत कोणत्यायात्राचे आयोजन केले आहे ?
A. समर्थ भारत यात्रा B. साक्षर भारत यात्रा C. भारत पुननिर्माण यात्रा D. राष्ट्रीयसाक्षरता यात्रा
Answer B. साक्षर भारत यात्रा
70. ऑक्टोबर 2012 मध्ये ' मिनी प्रवासी भारतीय दिन ' कोणत्या देशात/शहरात आयोजीतकेला जाणार आहे ?
A. मॉरीशस B. न्यूयार्क C. दुबई D. त्रिनाद आणि टोबॅगो
Answer दुबई
71.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यानउभारण्यात आला ?
A. पहिला B. दुसरा C. तिसरा D. चौथा
Answer A. पहिला
72.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?
A. हेरॉल्ड – डोमर B. पी. सी. महालनोबीस C. ए. एस. मान आणि अशोकरुद्र D. गांधीवादी
Answer A. हेरॉल्ड - डोमर
73. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?
A. ब्रिटन B. रशिया C. पश्चिम जर्मनी D.अमेरीका
Answer B. रशिया
74.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?
A. पाचवी B. आठवी C. सातवी D. दहावी
Answer A. पाचवी
75. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'
A. सातव्या B. आठव्या C. नवव्या D. दहाव्या
Answer C. नवव्या
76. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?
A. चौथी B. पाचवी C. सहावी D. सातवी
Answer B. पाचवी
77.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रमकोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?
A. तिसर्या B. चौथ्या C. पाचव्या D. सहाव्या
Answer C. पाचव्या
78.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?
A. 1 एप्रिल 1964 B.1 एप्रिल 1967 C. 1 एप्रिल1969 D. 1 एप्रिल 1971
Answer C. 1 एप्रिल 1969
79. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?
A. 1965 – 68 B. 1966 – 69 C. 1970 – 72 D. 1971 - 74
Answer B. 1966 - 69
80. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?
A. 1973 B. 1976 C. 1979 D. 1982
Answer 1973
81. हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?
A. रोकड पिके B. तेलबिया पिके C. कडधान्य D. तृणधान्य
Answer D. तृणधान्य
82.खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?
A. बीट B. ऊस C. गोड ज्वारी D. मका
Answer B. ऊस
83. महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .
A. सूर्यफूल B. करडई C. जवस D. मोहरी
Answer B. करडई
84. खालील भाताच्या वाणांपैकी हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे ?
A. बासमती B. आंबामोहोर C. रत्ना D. जया
Answer A. बासमती
85. सर्व साधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?
A. खरीप B. रब्बी C. उन्हाळी D. हिवाळी
Answer A. खरीप
86. शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?
A. 2-4 डी B. रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत C. बी.एच.सी. D. डी.डी.टी.
Answer A. 2-4 डी
87. ' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?
A. मका B. भात C. कांदा D. कोबी
Answer C. कांदा
88. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _____________ पिकांची फेरपालट चांगली असते .
A. ज्वारी-गहू B. भात-गहू C. बाजरी-गहू D. भुईमूग-गहू
Answer D. भुईमूग-गहू
89. प्रति हेक्टर 100 कि. ग्रॅ. बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता वउगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किलो बियाणे लागेल ?
A. 112 किलो B. 111 किलो C. 111.1 किलो D. 113 किलो
Answer B. 111 किलो
90. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?
A. 1941 B. 1943 C. 1945 D. 1947
Answer 1945
91. डॉ. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणत्या पारितोषिकानेगौरविण्यात आले ?
A. नोबेल B. बुकर C. मॅगसेसे D. संगीत नाटक अकादमी
Answer C. मॅगसेसे
92.भारतात सर्वाधीक ATM व शाखा असलेली बँक कोणती ?
A. बँक ऑफ इंडीया B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया C. स्टेट बँक ऑफइंडीया D. पंजाब नॅशनल बँक
Answer C. स्टेट बँक ऑफ इंडीया
93. श्री. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ______________ मंत्री आहेत ?
A. अवजड उद्योग B. ऊर्जा C. विज्ञान व तंत्रज्ञान D. नागरी उड्डाण
Answer B. ऊर्जा
94. ' द व्हाईट टाईगर ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
A. अमिताव घोष B. अरविंद अडीगा C. व्ही. एस. नायपॉल D. सलमान रश्दी
Answer B. अरविंद अडीगा
95. खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधित आहे ?
A. NPT B. SAFTA C. GATT D. लूक ईस्ट पॉलीसी
Answer A. NPT
96. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या ?
A. 1947-48 B. 1950-51 C. 1951-52 D. 1955-56
Answer C. 1951-52
97. सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखलकेली आहे ?
A. अण्णा हजारे B. अरविंद केजरीवाल C. बाबा रामदेव D.सुब्रमण्यम स्वामी
Answer D. सुब्रमण्यम स्वामी
98. 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चापुरस्कार प्राप्त झाला ?
A. करीना कपूर B. विद्या बालन C. प्रियंका चोप्रा D. कंगनारानावत
Answer B. विद्या बालन
99. ___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?
A. युवराज सिंग B. शेन वॉर्न C. अजय जडेजा D.वरीलपैकी नाही
Answer A. युवराज सिंग
100. ' इटस् नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ ' हे स्वतः च्या कर्करोगाशीदिलेल्या लढयाबाबत चे आत्मचरीत्र कोणत्या महान खेळाडूचे आहे ?
A. युवराज सिंग B. लान्स आर्मस्ट्रॉग C. मायकेल शुमेकर D. इम्रानखान
Answer लान्स आर्मस्ट्रॉग
101. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?
A. जे. आर. डी. टाटा B. कुमारमंगलम बिर्ल C. मोरारजी देसाई D.श्रीमाननारायण आगरवाल
Answer A. जे. आर. डी. टाटा
102.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?
A. 2 B. 3 C. 4 D. 5
Answer B. 3
103. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?
A. जॉन मथाई B. पंडीत जवाहरलाल नेहरू C. सी. डी. देशमुख D. आर.के. षण्मुगम
Answer D. आर. के. षण्मुगम
104. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?
A. 15 B. 7 C. 8 D. 22
Answer B. 7
105. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
A. राजस्थान B. महाराष्ट्र C. तामीळनाडू D. अरुणाचल प्रदेश
Answer A. राजस्थान
106. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणीलिहीला ?
A. सुभाषचंद्र बोस B. सी. डी. देशमुख C. एम. विश्वेश्वरैय्या D. पं.जवाहरलाल नेहरू
Answer C. एम. विश्वेश्वरैय्या
107. खालीलपैकी कोणती संस्था / मंडळ संवैधानीक दर्जा प्राप्त असलेली आहे ?
A. राष्ट्रीय विकास परिषद B. नियोजन मंडळ C. वरील दोन्ही D.दोन्हीही नाहीत
Answer D. दोन्हीही नाहीत
108.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?
A. मोरारजी देसाई B. पी. सी. महालबोनीस C. पंडीत जवाहरलाल नेहरू D. गुलझारीलाल नंदा
Answer D. गुलझारीलाल नंदा
109. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?
A. 2002 B. 2005 C. 2007 D. 2010
Answer C. 2007
110. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?
A. बुगेट B. बुके C. बजेटो D. बुगोटा
Answer बुगेट
111 मार्च 2012 चा विचार करता महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत ?
A. 7 B. 221 C. 5 D. 35
Answer C. 5
112.भामरागड - चिरोली - गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत?
A. उत्तरेकडील B. दक्षिणेकडील C. पूर्वेकडील D.पश्चिमेकडील
Answer C. पूर्वेकडील
113. 2010 -11 ह्या वर्षी महाराष्ट्राचा देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील वाटा किती टक्के होता?
A. 21.2 % B. 35.9 % C. 8.7 % D. 14.9 %
Answer D. 14.9 %
114. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .
A. 74 % B. 65 % C. 82.9 % D. 99.0 %
Answer C. 82.9 %
115. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर ____________ आहे .
A. 74 % B. 62 % C. 82.9 % D. 85 %
Answer A. 74 %
116. ' भारताचा मानव विकास अहवाल ' 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांककिती आहे ?
A. 0.572 B. 0.467 C. 0.815 D. 0.927
Answer B. 0.467
117. भारताचा मानव विकास अहवाल (Human Development Report)2011 नुसारमहाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक__________किती आहे .
A. 0.467 B. 0.572 C. 0.615 D. 0.317
Answer B. 0.572
118. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकासनिर्देशांकानुसार देशात कितवा क्रमांक आहे ?
A. पहिला B. पाचवा C. दहावा D. विसावा
Answer B. पाचवा
119. 'रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?
A. महाराष्ट्र B. गुजरात C. लक्षद्वीप D. उत्तरप्रदेश
Answer A. महाराष्ट्र
120. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांकलागतो ?
A. पहिला B. दुसरा C. तिसरा D. पाचवा
Answer B. दुसरा
121. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ ______________ आहे.
A. RNA B. DNA C. प्रथिने D. कोणताही नाही
Answer A. RNA
122.मानवी शरीरात किती खनिजे असतात ?
A. 18 B. 24 C. 58 D. 202
Answer B. 24
123. ____________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात .
A. धुण्याचा सोडा B. जिप्सम C. मोरचूद D. बॉक्साईट
Answer B. जिप्सम
124. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
A. हर्टझ् B. अम्पियर C. वॅटस् D. डेसीबेल
Answer D. डेसीबेल
125. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?
A. गुगल क्रोम B. नेटस्केप नेव्हीगेटर C. मोझीलाफायरफॉक्स D. एच.टी एम एल
Answer D. एच.टी एम एल
126. 'इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेऑरॉलॉजी' कोणत्या शहरात आहे ?
A. नाशीक B. नागपूर C. मुंबई D. पुणे
Answer D. पुणे
127. मोटारबोट व विमानाची गतीमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचावापर केला जातो ?
A. टेलीस्कोप B. स्फेरोमीटर C. टॅकोमीटर D. व्हिस्कोमीटर
Answer C. टॅकोमीटर
128. भारतातील कोणत्या शहरास 'इलेक्ट्रॉनिक्स शहर' म्हणतात ?
A. बेंगलोरु B. हैद्राबाद C. नोएडा D. पुणे
Answer A. बेंगलोरु
129. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र B. गुजरात C. राजस्थान D. उत्तरप्रदेश
Answer B. गुजरात
130. भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?
A. क्षेपणास्त्र B. अत्याधुनिक रणगाडा C. आण्वीकपाणबुडी D. रडार
Answer अत्याधुनिक रणगाडा
131. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक असते ?
A. पिष्टमय पदार्थापेक्षा स्निग्धांशाचे B. स्निग्धांशापेक्षा पिष्टमय पदार्थाचे
C. प्रथिनांपेक्षा स्निग्धांशाचे D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे
Answer D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे
132.शेतकरी खालीलपैकी कोणत्या बाबी आटोक्यात आणू शकत नाहीत ?
A. पिकांवरील रोगराई नियंत्रण B. पिकांच्या जातीची निवड
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण D. जमिनीची धूप व पाण्याचा निचरा
Answer C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण
133. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्रलागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे
A. फळपिके B. तंतुपिके C. कडधान्य व तेलपिके D.अन्नधान्य
Answer D. अन्नधान्य
134. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा _____________ आहे.
A. कमी B. जास्त C. बरोबरीने D. यापैकी कोणतेही नाही
Answer B. जास्त
135.सरी पद्धत ________________ जमिनीकरिता योग्य नाही .
A. भारी जमीन B. रेताड जमीन C. मध्यम जमीन D. काळीजमीन
Answer B. रेताड जमीन
136. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?
A. दुध उत्पादन B. ऊस उत्पादन C. अन्नधान्य उत्पादन D. तंतू उत्पादन
Answer C. अन्नधान्य उत्पादन
137. कडधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यात प्रामुख्याने या गोष्टींची अडचण येते ?
A. कीड व रोगराईमुळे नुकसान होते B. अधिक उत्पादन देणार्या वाणाचीउपलब्धता नसणे
C. रायझोबियम जीवाणू खतांचा तुरळक वापर D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व
138. ज्वारी मध्ये तुरीचे पिक 2 : 1 ओळी या प्रमाणे घेण्याच्या पद्धतीस______________ म्हणतात .
A. दुहेरी पिकपद्धत B. मिश्र पिकपद्धत C. आंतर पिकपद्धत D. साखळीपिकपद्धती
Answer C. आंतर पिकपद्धत
139. लहान शेतकरी _____________ या आकारमानाच्या क्षेत्रात मोडतो .
A. 0 ते 1 हेक्टर B. 1 ते 2 हेक्टर C. 2 ते 4 हेक्टर D. 4 ते 10हेक्टर
Answer B. 1 ते 2 हेक्टर
140. भात पिकाची रोपे तयार करण्याची 'दापोग' पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडूनआली ?
A. चीन B. जपान C. फिलिपाईन्स D. कोरिया
Answer फिलिपाईन्स
141. दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशीसंबंधित आहेत ?
A. बॅडमिंटन B. बुद्धीबळ C. महिला क्रिकेट D.कबड्डी
Answer D. कबड्डी
142.रमेश भेंडीगिरी हे कब्बडीचे प्रशिक्षण कोणत्या स्पर्धेनंतर विशेष प्रकाशझोतात आले ?
A. पहिला पुरुष कबड्डी विश्वचषक B. पहिला पुरुष कबड्डी आशीया चषक
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक D. पहिला महिला आंतरराज्य कबड्डीचषक
Answer C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक
143. पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडल्या ?
A. नवी दिल्ली , भारत B. पाटणा , भारत C. तेहरान , इराण D.इस्लामाबाद , पाकीस्तान
Answer B. पाटणा , भारत
144. पहिला महिला कब्बड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिमसामन्यात नमवत पटकावला ?
A. जपान B. पाकीस्तान C. बांगलादेश D. इराण
Answer D. इराण
145. 'होळकर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी B. कब्बड्डी C. ब्रिज D. क्रिकेट
Answer C. ब्रिज
146. निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?
A. 2012 B. 2015 C. 2017 D. 2020
Answer C. 2017
147. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केलेजात आहे .
A. पूरक कृषी उत्पादन वर्ष B. फलोत्पादन वर्ष C. नगदी पिकांचीशेती वर्ष D. शाश्वत शेती वर्ष
Answer B. फलोत्पादन वर्ष
148.अलीकडेच निधन पावलेले ' रवी ' अर्थात रवी शंकर शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधितहोते ?
A. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार B. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
C. लेखक D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार
Answer D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार
149. 'ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?
A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.
Answer D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.
150. ______________________ प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ , अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?
A. बेसॉल्ट B. पांढरा संगमरवर C. ग्रॅनाईट D. यापैकी नाही
Answer बेसॉल्ट
151.अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?
A. गडद निळा B. पांढरा C. काळा D. तपकिरी
Answer C. काळा
152. खालीलपैकी काय अर्धवाहकाचे ( Semiconductor ) चे उदाहरण आहे ?
A. तांबे B. फॉस्फरस C. काच D. सिलीकॉन
Answer D. सिलीकॉन
153. खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही ?
A. हवा B. पाणी C. स्टील D. निर्वात पोकळी
Answer D. निर्वात पोकळी
154.खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रीक ऊर्जेत करते ?
A. इलेक्ट्रीक मोटार B. विद्युत जनित्र ( Dynamo ) C. ट्रान्सफॅर्मर D. वरील सर्व
Answer A. इलेक्ट्रीक मोटार
155. तार्यांमधील अंतरे कोणत्या एककात मोजली जातात ?
A. किलोमीटर B. मैल C. नॉटीकल मैल D. प्रकाशवर्ष
Answer D. प्रकाशवर्ष
156. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये _____________ हा खनिज पदार्थ असतो .
A. आयोडीन B. लोह C. कॅल्शिअम D. फॉस्फरस
Answer B. लोह
157.प्लॅस्टिक उद्योगाचा विचार करता " PVC" हा शब्द कशासाठी वापरला जातो ?
A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड B. पॉलीव्हीनाईल कार्बोनेट C. पॉलीस्टर व्हराईटी कंपाउंड D. पोस्ट व्हिनाईलक्लोराईड
Answer A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड
158. मानवी मेंदूचे वजन किती असते ?
A. 500 ते 600 ग्रॅम्स B. 700 ते 1000 ग्रॅम्स C. 1300 ते 1400 ग्रॅम्स D. 1500 ते1800 ग्रॅम्स
Answer C. 1300 ते 1400 ग्रॅम्स
159. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये कोणत्याप्रकारच्या लढाऊ विमानातून प्रवास केला ?
A. मिग -29 B. एफ – 16 C. जॅग्वार D. सुखोई - 30एम के आय
Answer D. सुखोई - 30 एम के आय
160. इस्त्राईलच्या मदतीने विकसित केला गेलेला कोणता हेरगिरी ( Spy ) उपग्रह इस्त्रोने ( ISRO ) एप्रिल 2009 मध्ये अवकाशात पाठविला गेला ?
A. स्फुटनिक B. चांद्रयान – 1 C. आर्यभट्ट D. रिसॅट - 2
Answer D. रिसॅट – 2
161. 2012-13 ह्या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला ?
A. 27 फेब्रुवारी 2012 B. 28 फेब्रुवारी 2012 C. 29 फेब्रुवारी 2012 D. 16मार्च 2012
Answer D. 16 मार्च 2012
162.भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?
A. दिनेश त्रिवेदी B. पी. चिदंबरम C. कमल नाथ D. प्रणवमुखर्जी
Answer D. प्रणव मुखर्जी
163. खालीलपैकी कोणते भारतीय पंतप्रधानांनी अर्थमंत्री पदही भूषविले ?
अ. जवाहरलाल नेहरू ब. मोरारजी देसाई क. इंदीरा गांधी ड. व्ही. पी.सिंग ई. मनमोहन सिंग
A.अ, ब, क, ई B. क, ड, ई C. ब, ड, ई D. अ, ब, क, ड, ई
Answer D. अ, ब, क, ड, ई
164. 2012-13 ह्या वर्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा अर्थंसंकल्प कोणी मांडला?
A. श्री. अजित पवार B. श्री. हर्षवर्धन देशमुख C. श्री. सुनिल तटकरे D. श्री.पृथ्वीराज चव्हाण
Answer A. श्री. अजित पवार
165. अलीकडेच प्रदान केलेल्या 2010 - 11 साठीच्या ' राष्ट्रीय पर्यटन पारितोषिकां ' मध्येमहाराष्ट्रातील कोणत्या हॉस्पीटलला ' सर्वोत्कृष्ट वैद्यकीय पर्यटन सुविधा ' ( Best Medical Tourism Facility ) म्हणून गौरविण्यात आले ?
A. ससून रुग्णालय , पुणे B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे C. के. इ. एम. मुंबई D. जसलोक हॉस्पीटल , मुंबई
Answer B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे
166. ब्रिक्स ( BRICS ) देशांची 4 थी परिषद कोठे पार पडली ?
A. सान्या , चीन B. नवी दिल्ली , भारत C. ब्राझीलिया , ब्राझील D.मास्को , रशिया
Answer B. नवी दिल्ली , भारत
167. ' जागतिक मलेरीया दिन ' कोणत्या तारखेला साजरा करतात ?
A. 22 फेब्रुवारी B. 23 मार्च C. 22 एप्रिल D. 25 एप्रिल
Answer D. 25 एप्रिल
168. अलीकडेच रीझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बँकरेट वाढवून 9.5 % केला . ही वाढ कितीकालावधीनंतर झाली ?
A. 6 महिने B. 2 वर्ष C. 5 वर्ष D. 9 वर्ष
Answer D. 9 वर्ष
169. भारतीय जंगलांवरील 2011 च्या अहवालानुसार ( India State Forest Report 2011 ) भारतातील सर्वाधीक जंगलांचे एकूण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
A. महाराष्ट्र B. अरुणाचल प्रदेश C. मध्यप्रदेश D.हिमाचल प्रदेश
Aanswer C. मध्यप्रदेश
170. महाराष्ट्राच्या 2012 -13 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य शासन कोणत्या शहरात 'मराठी भाषा भवन ' बांधण्याच्या विचारात आहे ?
A. नागपूर B. नाशीक C. पुणे D. मुंबई
Answer D. मुंबई
171. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?
A. चार B. सहा C. आठ D. दहा
Answer C. आठ
172.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकीकोणत्या अभियानांचा समावेश आहे ?
A. राष्ट्रीय सौर अभियान B. राष्ट्रीय जल अभियान C. राष्ट्रीय शाश्वत शेतीअभियान D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व
173. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यानेक्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?
A. पॅरीस करार B. वार्सा करार C. जिनेव्हा करार D.माँट्रीयल करार
Answer D. माँट्रीयल करार
174. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?
A. नायट्रीक ऑक्साईड B. नायट्रस ऑक्साईड C. हायड्रोजनसल्फाइड D. अमोनिया
Answer A. नायट्रीक ऑक्साईड
175. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?
A. 23 मार्च B. 22 डिसेंबर C. 20 एप्रिल D. 5 जून
Answer C. 20 एप्रिल
176. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?
A. 0 ते 5 कि.मी .B. 15 ते 25 कि.मी. C. 25 ते 40 कि.मी. D. 40 ते 80कि.मी.
Answer C. 25 ते 40 कि.मी.
177. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्यातयार झाली आहे ?
A. वायू प्रदूषण B. जल प्रदूषण C. व्हच्र्युअल कचरा D. ई -कचरा
Answer D. ई - कचरा
178. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?
A. मुंबई B. नाशिक C. औरंगाबाद D. नागपूर
Answer D. नागपूर
179. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. डॉ. मनमोहनसिंग B. न्या. के. जी. बालकृष्णन C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन D.न्या. बी. एन. कृपाल
Answer D. न्या. बी. एन. कृपाल
180. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
A. विलासराव साळुंखे B. अण्णा हजारे C. डॉ. राजेंद्रसिंह D.बाबा आमटे
Answer A. विलासराव साळुंखे
181. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?
A. चार B. सहा C. आठ D. दहा
Answer C. आठ
182.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकीकोणत्या अभियानांचा समावेश आहे ?
A. राष्ट्रीय सौर अभियान B. राष्ट्रीय जल अभियान C. राष्ट्रीय शाश्वत शेतीअभियान D. वरील सर्व
Answer D. वरील सर्व
183. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यानेक्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?
A. पॅरीस करार B. वार्सा करार C. जिनेव्हा करार D.माँट्रीयल करार
Answer D. माँट्रीयल करार
184. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?
A. नायट्रीक ऑक्साईड B. नायट्रस ऑक्साईड C. हायड्रोजनसल्फाइड D. अमोनिया
Answer A. नायट्रीक ऑक्साईड
185. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?
A. 23 मार्चB. 22 डिसेंबर C. 20 एप्रिल D. 5 जून
Answer C. 20 एप्रिल
186. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?
A. 0 ते 5 कि.मी. B. 15 ते 25 कि.मी. C. 25 ते 40 कि.मी. D. 40 ते 80 कि.मी.
Answer C. 25 ते 40 कि.मी.
187. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्यातयार झाली आहे ?
A. वायू प्रदूषण B. जल प्रदूषण C. व्हच्र्युअल कचरा D. ई -कचरा
Answer D. ई - कचरा
188. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?
A. मुंबई B. नाशिक C. औरंगाबाद D. नागपूर
Answer D. नागपूर
189. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
A. डॉ. मनमोहनसिंग B. न्या. के. जी. बालकृष्णन C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन D.न्या. बी. एन. कृपाल
Answer D. न्या. बी. एन. कृपाल
190. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
A. विलासराव साळुंखे B. अण्णा हजारे C. डॉ. राजेंद्रसिंह D.बाबा आमटे
Answer A. विलासराव साळुंखे
191. राज्यातील पिकांवर पडलेल्या कीड आणि रोगांचे योग्य पध्दतीने सर्व्हे करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या 'कृषी विभागा'ला केंद्र सरकारचे २०११-१२ सालचे ई- गव्हर्नन्ससाठीचे _________ घोषित झाले आहे.
A. कांस्य पदक B. रजत पदक C. सुवर्ण पदक D. उत्तेजनार्थ पारितोषिक
Answer C. सुवर्ण पदक
192. भारताचे परराष्ट्रसचिव कोण आहेत ?
A. निरुपमा राव B. रंजन मथाई C. एस.एम.कृष्णा D. सुनील मित्रा
Answer B. रंजन मथाई
193. अलीकडेचा बेकायदेशीर टेलिफोन टॅपिंग ______________ ह्या माध्यम सम्राटाला जाहीर माफी मागावी लागली.
A. रुपर्ट मडॉक B. वेटॉन सुराई C. रुडी वॅण्डरलण्डस D. यापैकी नाही
Answer A. रुपर्ट मडॉक
194. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर (Sex Ratio) ____________ इतके आहे.
A. 925 B. 934 C. 918 D. 968
Answer A. 925
195. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 2001 च्या तुलनेत ________ A. वाढ झाली आहे. B. घट झाली आहे. C. प्रमाण स्थिर आहे. D. तुलनेसाठी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
Answer B. घट झाली आहे.
196. बेंगलूर येथील श्रीराम सेवा मंडळी ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा 'एस.व्ही.नारायणस्वामी राम स्मृती' राष्ट्रीय पुरस्कार कोणता प्रदान करण्यात आला ?
A. पं.भीमसेन जोशी B. ए.आर.रहमान C. सुरेश वाडकर D. उदीत नारायण
Answer A. पं.भीमसेन जोशी
197. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ______________ ह्या एकमात्र जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.
A. नंदूरबार B. सिंधुदुर्ग C. कोल्हापूर D. रत्नागिरी
Answer B. सिंधुदुर्ग
198. टाटा केमिकल्सने अलीकडील काळात ____________ ही कंपनी 650 कोटी रुपयांना विकत घेतली.
A. अमेरिकन सॉल्ट B. कॅप्टन कूक C. चायनीज रॉकसॉल्ट D. ब्रिटीश सॉल्ट
Answer D. ब्रिटीश सॉल्ट
199. जगात तांबे उत्पादनात _______________ या देशाचा प्रथम क्रमांक लागतो.
A. भारत B. चिली C. ब्राझील D. चिन
Answer B. चिली
200. विधानसभेचे अधिवेशन कुठल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भरते ?
A. महाराष्ट्र B. जम्मु आणि काश्मिर C. वरील दोन्ही राज्यात D. (1) व (2) दोन्ही उत्तरे चुक
Answer C. वरील दोन्ही राज्यात
No comments:
Post a Comment
तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा