Breaking

Search this Blog

MPSC Forest Service Exam Syllabus,Book List - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शन

‘महाराष्ट्र वन सेवा’ परीक्षेद्वारे केल्या जाणाऱ्या नेमणुकीविषयी, अभ्यासक्रमाविषयी व आवश्यक पात्रतेविषयी माहिती .
महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट ‘अ’ (ACF) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (Ranger)  या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.
परीक्षेचे टप्पे
  • पूर्वपरीक्षा- १०० गुण
  • मुख्य परीक्षा- ४०० गुण
  • मुलाखत- ५० गुण

परीक्षेसाठी आवश्यक पात्रता
१. शैक्षणिक अर्हता – वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अ‍ॅॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.
विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. शारीरिक पात्रतेविषयीचा तक्ता स्वतंत्रपणे दिला आहे.Prev
३. डोळयाची दृष्टीतीक्ष्णता (व्हिज्युअल अ‍ॅक्विटी) ६/६ असावी.
पूर्व परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वन सेवा पूर्वपरीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम १/१०/२०१५ रोजी त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेला आहे.अभ्यासक्रम :
  • मराठी भाषा
  • इंग्रजी भाषा
  • जागतिक, भारतातील चालू घडामोडी.
  • बुद्धिमत्ता आणि अंकगणित.

२०१४च्या वन सेवा परीक्षेचे विश्लेषण केल्यास आयोगाने प्रश्न वरील घटकांवर  विचारल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र, सुधारित अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान हा घटक पूर्व परीक्षेतून वगळण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार वरील चार घटकांवर समप्रमाणात प्रश्न विचारले जातील असे गृहीत धरल्यास प्रत्येक घटकावर किमान २० ते २५ प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही घटकावर दुर्लक्षित न करता परीक्षार्थीनी प्रत्येक घटकाच्या अभ्यासाला समप्रमाणात वेळ द्यावा.
२०१४ च्या पूर्वपरीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास प्रामुख्याने असे नमूद करणे योग्य ठरेल की, जास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीना निगेटिव्ह मार्किंगचा फटका बसला आहे. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म विश्लेषण करावे व सखोल अभ्यास आणि प्रश्नपत्रिकेचा सराव यावर भर द्यावा.
अभ्यासाचे नियोजन
मराठी व इंग्रजी या विषयांचे व्याकरण व उताऱ्यांचा सराव दररोज करावा.
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या घटकाला दिवसातून किमान दोन तास द्यावेत.
चालू घडामोडी या घटकासाठी परीक्षार्थीनी दररोज किमान एक मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचून स्वत:चे टिपण तयार करावे.
संदर्भ साहित्य सूची
१) मराठी भाषा-
* सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वािळबे
* मराठी व्याकरण- बाळासाहेब िशदे
२) इंग्रजी भाषा-
* English Grammer- Wern & Martin
* English Grammer- Pal & Suri

३) बुद्धिमत्ता व अंकगणित-
* बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित- आठवी, नववी, दहावी.
* एमटीएसची पुस्तके.
* क्वान्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड- आर. एस. अगरवाल
* रिझिनग- आर. एस.अगरवाल.
४) चालू घडामोडी-
योजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे इंग्रजी व मराठी दैनिक.
वरील लेखात आपण महाराष्ट्र वन सेवा परीक्षेचे टप्पे, पूर्वपरीक्षेचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता यांची माहिती घेतली. आता आपण वन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करूयातवन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करूयात आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे आखता येईल ते पाहू या..
मुख्य परीक्षेचे स्वरूप
* मुख्य परीक्षा – ४०० गुण
* प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन.

१. सामान्य अध्ययन (General Studies).
२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन.(General Science & Nature Conservation)
आयोगाने वन सेवा मुख्य परीक्षेतील पेपर २ ची विभागणी सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन या दोन घटकांत केलेली आहे.
अभ्यासक्रम
पेपर क्रमांक १ :
सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज)
१. भारताचा इतिहास. महाराष्ट्रावर अधिक भर.
२. देशाचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. महाराष्ट्रावर अधिक भर.
३. भारतीय राज्यसंस्था व शासन. घटना आणि राजकीय प्रणाली, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था.
४. आर्थिक आणि सामाजिक विकास.
पेपर क्रमांक २ :
मुख्य परीक्षा पेपर क्र. २ चे माध्यम  केवळ इंग्रजी असते, याची नोंद परीक्षार्थीनी घ्यावी. या विषयात सामान्य विज्ञान  (जनरल सायन्स) आणि निसर्ग संवर्धन  (नेचर कॉन्झर्वेशन) या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१. सामान्य विज्ञान (जनरल सायन्स)- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र.
२. निसर्ग संवर्धन (नेचर कॉन्झर्वेशन)-
२.१ * मृदा – मृदेचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैवशास्त्रीय गुणधर्म. प्रक्रिया आणि माती निर्मितीचे घटक. खनिज आणि मातीचे सेंद्रिय घटक, मृदेच्या उत्पादकतेत त्यांची भूमिका, मातीचा प्रकार, मातीसंबंधित समस्या आणि त्यात सुधारणा.
* माती आणि ओलावा टिकणे- जमिनीची धूप होण्याची कारणे, नियंत्रणाची पद्धत. वनाची भूमिका, पाणलोट व्यवस्थापन वैशिष्टय़े आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी उचलावी लागणारी पावले.
२.२ * पर्यावरणीय व्यवस्था – प्रकार, अन्नसाखळी, अन्न जाळे, पर्यावरणीय पिरॅमिड, ऊर्जेचा प्रवाह, कार्बन आणि नायट्रोजनचे जैवरासायनिक चक्र.
* खते – सेंद्रिय आणि रासायनिक.
* वनस्पती आणि प्राण्यांचे आजार.
* कीटकनाशके.
* इजा होऊ शकतील अशा वनस्पती आणि तण.
२.३* पर्यावरणीय प्रदूषण – प्रकार, नियंत्रण, जैव निर्देशक आणि धोक्यात आलेल्या प्रजाती.
* उत्खनन आणि खाणकामासंबंधित पर्यावरणीय समस्या.
* ग्रीनहाऊस इफेक्ट, कार्बन ट्रेिडग, पर्यावरणीय बदल.
२.४ * देशातील महत्त्वाची जंगली श्वापदे.
* गुरांच्या जाती, चारा आणि गवताळ प्रदेश व्यवस्थापन, कुरणांचे अर्थशास्त्र.
२.५*  देशातील महत्त्वाच्या स्थानिक वृक्षांच्या जाती, विदेशी वनस्पती, वनस्पती- उत्पादनाचा स्रोत. उदा. अन्न, फायबर, जळाऊ लाकूड, इमारतीसाठीचे लाकूड इत्यादी. वनउत्पादन, औषधी वनस्पती, ऊर्जा लागवड, खारफुटी, वनआधारित उद्योग.
* वनस्पतीच्या वाढीवर आणि वितरणावर परिणाम करणारे घटक. भारतातील वनांचे प्रकार.
२.६*  राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये. जागतिक वारसा वास्तू.
* सामाजिक वनीकरण, वन व्यवस्थापन, शेती वनीकरण.
* भारतीय वन धोरण, भारतीय वन कायदा, वन्य जीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा, १९८०.
* निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था.
२.७ * हवाई छायाचित्रे, संकल्पनात्मक नकाशे, उपग्रह चित्रे यांचा वापर. ‘जीआयएस’चे तत्त्व आणि उपयोजन.
* जैवविविधता, जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे, जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व.
* वनस्पती प्रजनन, ऊती, आदिवासी आणि वन, देशातील महत्त्वाच्या जमाती.
वरील विश्लेषणावरून असे दिसते की, पेपर क्र. १ मधील इतिहास या घटकात समाजसुधारकांचे कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारकांची विधाने, ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे व तरतुदी. भूगोल या घटकात प्रामुख्याने महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या उपघटकांवर भर देण्यात आला आहे. तसेच जगाचा भूगोल, भूगोलातील मूलभूत संकल्पना, पर्वत, पठारे, मृदा, प्राकृतिक विभाग यांचाही अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. राज्यशास्त्र या घटकात भारताच्या संविधानातील कलमे, तरतुदी, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती, तज्ज्ञांची मते, जोडय़ा लावणे, कालखंडांचा चढता-उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटकात अर्थशास्त्रातील मूलभूत संज्ञा व संकल्पना, शासकीय धोरणे, योजना, िलग गुणोत्तर, कृषी, उद्योग व सेवा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
पेपर- २ चे विश्लेषण करायचे झाल्यास विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, परीक्षार्थीनी पर्यावरणीय संकल्पना, शासन निर्णय, धोरणे, कायदे, जैवविविधता, वन्यपशू- वनस्पती प्रजाती, त्यांना होणारे रोग, पर्यावरणीय समस्या, वन धोरण यांच्या अभ्यासावर भर द्यावा.
संदर्भसूची 
पेपर १- इतिहास- राज्य परीक्षा मंडळाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर व बेल्हेकर, महाराष्ट्राचा इतिहास- कठारे, गाठाळ, भूगोल- राज्य परीक्षा मंडळाची सहावी ते बारावीची पुस्तके, जिओग्राफी थ्रू मॅप- के. सिद्धार्थ,  महाराष्ट्राचा भूगोल- सवदी, खतीब. राज्यशास्त्र- इडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची अकरावी-बारावीची पुस्तके. अर्थशास्त्र – इंडियन इकोनॉमी-  रमेश सिंग, भारताचा व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल.
पेपर २-

वरती  आपण महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम याची माहिती करून घेतली. आज आपण २०१४ व २०१६ मधील मुख्य परीक्षा पेपर क्र. १ (सामान्य अध्ययन) व पेपर क्र. २ (सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन) यांतील प्रश्नपत्रिकांचे मुद्देसूद विश्लेषण करू.



– मुख्य परीक्षेचे स्वरूप
– मुख्य परीक्षा – ४०० गुण
– प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन
१. सामान्य अध्ययन
२. सामान्य विज्ञान आणि निसर्ग संवर्धन

२०१४ व २०१६ च्या मुख्य परीक्षेचे विश्लेषण
पेपर क्र. १
पेपर क्र. २
वरील विश्लेषणावरून असे दिसते की, पेपर क्र. १ मधील इतिहास या घटकात समाजसुधारकांची काय्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, समाजसुधारकांची विधाने, ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे व तरतुदी, याघटकांवर भर देण्यात आला आहे. भूगोल या घटकात प्रामुख्याने महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या उपघटकांवर भर देण्यात आला आहे. तसेच जगाचा भूगोल, भूगोलातील मूलभूत संकल्पना, पर्वत, पठारे, मृदा, प्राकृतिक विभाग यांचाही अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. राज्यशास्त्र या घटकात भारताच्या संविधानातील कलमे, तरतुदी, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, तज्ज्ञांची मते, जोडय़ा लावणे, कालखंड चढता उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.अर्थशास्त्र व सामाजिक विकास या घटकात अर्थशास्त्रातील मूलभूत संज्ञा व संकल्पना, शासकीय धोरणे, योजना, लिंगगुणोत्तर, कृषी, उद्योग व सेवा यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
पेपर २ चे विश्लेषण करायचे झाल्यास विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की, २०१४ व २०१६ मध्ये सामान्य विज्ञान (जनरल सायन्स) आणि फॉरेस्ट्री या उपघटकांवर आयोगाने विशेष भर दिलेला आहे. सामान्य विज्ञान या घटकामध्ये ध्वनी, उष्णता, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, पेशी, ऊती, सजीवांचे वर्गीकरण, मुलद्रव्यांचे वर्गीकरण, सजीवांचे जीवनप्रक्रिया रोग आणि विकार, सूक्ष्मजीव या उपघटकांवर प्रश्न विचारलेले आहेत. फॉरेस्ट्री हा घटक संबंधित पदांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असल्यामुळे आयोगाने या घटकातील प्रश्नांचा दर्जा उच्च स्वरूपाचा ठेवल्याचे दिसते. हा घटक अभ्यासताना बेसिक ते दर्जेदार पुस्तके असा अभ्यासाचा क्रम ठेवावा.
निसर्ग संवर्धन (नेचर कन्झर्वेशन) आणि पर्यावरणीय व्यवस्था या घटकात  मृदेचे गुणधर्म, प्रक्रिया जमिनीची धूप, वनांची भूमिका, पर्यावरण प्रदूषण, शासननिर्णय, धोरणे, कायदे, जैवविविधता, वन्य पशू-वनस्पती प्रजाती, त्यांना होणारे रोग, पर्यावरणीय समस्या यांच्या अभ्यासावर भर द्यावा.
संदर्भसूची – 
पेपर १
इतिहास – राज्य परीक्षा मंडळाची ५, ८, ११ वीची पुस्तके
– आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर व बेल्हेकर
– महाराष्ट्राचा इतिहास – कठारे, गाठाळ
भूगोल – राज्य परीक्षा मंडळाची ६ वी ते १२ वीची पुस्तके
– जिओग्राफी थ्रू मॅप – के. सिद्धार्थ
– महाराष्ट्राचा भूगोल – सवदी, खतीब

राज्यशास्त्र – इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत, राज्य परीक्षा मंडळाची ११ वी, १२ वीची पुस्तके.
अर्थशास्त्र- इंडियन इकॉनॉमी – रमेश सिंग भारताचा व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल.

पेपर २
१. सामान्य विज्ञान
– एन.सी.ई.आर.टी.ची – ८ वी ते १० वी
– राज्य परीक्षा मंडळाची ८ ते १० वीची पुस्तके
– समग्र सामान्य विज्ञान – नवनाथ जाधव
(के. सागर प्रकाशन)

२. निसर्ग संवर्धन
१. लुकेन्स जनरल स्टडीज (इकॉलॉजी आणि पर्यावरण)
२. भूगोल आणि पर्यावरण – सवदी
३. शंकर आ.ए.एस. (एन्व्हायरॉन्मेंट)
४. ई. बरुचा (पर्यावरण)
५. आय.सी.एस.ई. (नववी आणि दहावीची पर्यावरणाची पुस्तके)
६. फॉरेस्ट्री – अंटोनी राज आणि लाल
७. इंडियन फॉरेस्ट्री – मनिकंदन आणि प्रभू
८. प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रोनॉमी – रेड्डी
९. कृषीविषयक – के. सागर
१०. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – के. सागर
११. राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११ वी १२ वी पुस्तके


1 comment:

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा