Breaking

Search this Blog

02 April 2015

‎All‬ the best for Rajyaseva Prelim 2015 from MPSC राज्यसेवा मार्गदर्शन

                    All‬ the best for Rajyaseva Prelim 2015
                                      from
                     MPSC राज्यसेवा मार्गदर्शन
________________________________________
या परीक्षेची तयारी करताना खालील बाबी विचारात घ्या :
1. सराव विशेषतः अंकगणित व बुद्धिमापन चाचणीचा आणि चालू घडामोडींवरील पकड गरजेची आहे.
2. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचा. दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्धा तास आधी परीक्षा हॉल मध्ये जावून बसा.
3. परीक्षेचा क्रमांक उत्तरपत्रिकेत भरण्यापूर्वी ते कसे भरायचे ते समजावून घ्या. लक्षात ठेवा , खाडाखोड किंवा क्रमांक नोंदवताना केलेली चूक खूप महागात पडू शकते.
4. प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर तिच्यात सर्व प्रश्न आणि पृष्ठ आहेत हे तपासा. प्रश्नपत्रिकेची सेरीज व्यवस्थितपणे उत्तरपत्रिकेवर लिहा शिवाय वर्तुळात ते नीटपणे 'डार्क' करा.
5. ज्या परिक्षार्थींनी गेल्या 2/3 वर्षात आयोगाची परीक्षा दिलेली नसेल त्यांनी अनुभवी लोकांकडून उत्तरपत्रिकेच्या दोन प्रती (स्वत:ची आणि आयोगाची ) असतात आणि त्या परीक्षा संपल्यावर वेगळ्या करायच्या असतात, ते नेमके कसे ते समजावून घ्या. तसे फाडताना तुमचा पेपर फाटणार नाही ह्यासाठी दक्ष राहा.
6. डोके शांत ठेवा.
7. सर्वप्रथम परफेक्ट येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
8. येत नसलेल्या / आठवत नसलेल्या प्रश्नावर आता मेहनत नको. सर्व प्रश्नांना सारखेच गुण आहेत हे नेहमी लक्षात ठेवा.
9. प्रश्नपत्रिकेचा पहिला राउंड वरीलप्रमाणे संपवल्यावर आता शक्यतो (ज्या पेपर मध्ये असतील त्या ठिकाणी गणिताचे आणि बुध्दीमापनाचे प्रश्न) हाती घ्या. मध्ये मध्ये हातावरच्या घड्याळावरही लक्ष असू द्या.
10. आता परत प्रश्नपत्रिकेचा दुसरा राउंड घ्या . ह्यावेळी ठामपणे माहित नसलेले पण दोन उत्तरांपैकी एकाची खात्री वाटते असे प्रश्न निवडा. पर्याय 'एलीमिनेट ' करत जा. म्हणजे हे उत्तर नक्कीच नाही, असे करून कमीतकमी पर्याय मागे ठेवा . शक्यतो दोनच. आणि आता थोडे आठवायचा प्रयत्न करा शक्यता आहे तुम्हाला नेमके उत्तर येईल. येथे मर्यादित स्वरुपाची रिस्क घ्यायला हरकत नसावी.
11. आता प्रश्नपत्रिकेचा शेवटचा राउंड घ्या. उरलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे लिहायची ते ठरवा . निगेटिव्ह गुणदान पद्धतीचा विसर नको.
12. हे सर्व करताना तुम्ही प्रश्न क्रमांक आणि उत्तर पत्रिकेतील क्रमांक ह्यांचा ताळमेळ ठेवा . चुकूनही एखाद्या प्रश्नाचे उत्तर दुसर्यारसमोर लिहू नका. आणि तसे झालेच तर टेन्शन घेवू नका. जे झाले ते झाले आता तरी डोके शांत ठेवा.
13. सर्व काही करताना आपल्याकडे असणारा वेळ आणि अटेम्प्ट करायचे प्रश्न ह्यांचा ताळमेळ बिघडू देवू नका.
ALL THE BEST !!!

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा