Breaking

Search this Blog

07 May 2014

MPSC MAINS GS SYLLABUS 2020



सामान्‍य अध्‍ययन एक
इतिहास व भूगोल

दर्जा : पदवी                                            एकूण गुण :१५०
प्रश्‍नपत्रिकेचे स्‍वरूप वस्‍तुनिष्‍ठ                           कालावधी : २ तास
टीप :
(1) प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांचे स्‍वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्‍यक्‍ती कोणताही विशेष अभ्‍यास न करता उत्‍तर देऊ शकेल, विविध विषयातील उमेदवारांच्‍या सामान्‍य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्‍याचा उद्देश आहे.
(उमेदवारांनी खाली नमूद केलेल्‍या विषयातील / उपविषयातील अद्दयावत व चालू घडामोडींचा अभ्‍यास करणे अपेक्षित आहे.
---------------------------------------
. इतिहास :
.१ आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्‍ट्राचा इतिहास (१८१८-१८५७): आधुनिक शिक्षणाची ओळख - वृत्‍तपत्रे, रेल्‍वे, टपाल व तार, उद्दयोगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक - धार्मिक सुधारणा - यांचा समाजावरील परिणाम.
.  ब्रिटीश सत्‍तेची भारतामध्‍ये स्‍थापना : प्रमुख भारतीय सत्‍तांच्‍या विरूध्‍द युध्‍दे, तैनाती फौज धोरणखालसा धोरण१८५७पर्यंतचीब्रिटीश राज्‍याची रचना.
.  सामाजिक - सांस्‍कृतिक बदल : ख्रिश्‍चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक - धार्मिक सुधारणांच्‍या चळवळीः ब्राम्‍हो समाज, प्रार्थना समाज,सत्‍यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लिम धर्मियांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्‍ड क्‍लासेस मिशन, ब्राम्‍हणेतर चळवळ व जस्‍टीस पार्टी.
.  सामाजिक व आर्थिक जागृती : भारतीय राष्‍ट्रवाद - १८५७ चा उठाव आणि त्‍यानंतर, इंडियन नॅशनल कॉंग्रेस (१८८५ - १९४७) आझाद हिंद सेना, महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींची भूमिका, स्‍वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमधील वृत्‍तपत्रे व शिक्षण यांची भूमिका.
.  भारतीय राष्‍ट्रवादाची निर्मिती व विकास : सामाजिक पार्श्‍वभूमी, राष्‍ट्रीय संघटनांची स्‍थापना, शेतकऱ्यांचे उठाव, इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्‍थापना, मवाळ गटाची वाढजहाल गटाची वाढ, मोर्ले-मिंटो सुधारणा, स्‍वराज्‍याची चळवळ, लखनौ करार, मॉंट-फोर्ड सुधारणा.
.६  गांधी युगातील राष्‍ट्रीय चळवळ : गांधीजींचे नेतृत्‍व आणि प्रतिकाराचे तत्‍व,गांधीजींच्‍या लोक चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्‍याग्रह,चलेजाव चळवळ, सत्‍यशोधक समाज, गांधीजी आणि अस्‍पृश्‍यता निर्मूलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अस्‍पृश्‍यांच्‍या समस्‍येबाबतचा दृष्‍टीकोन, मुस्लिम राजकारण आणि स्‍वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ,मुस्लिम लीग व अली बंधू, इक्‍बाल, जिना), संयुक्‍त पक्ष (युनियनिस्‍ट पार्टी)   कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्‍यवादी नेते आणि भारतीय स्‍वातंत्र्य चळवळ, कॉंग्रेस समाजवादी पार्टी, राष्‍ट्रीय चळवळीतील महिला सहभाग,संस्‍थानातील जनतेची चळवळ, साम्‍यवादी (डावी) चळवळ - शेतमजुरांची चळवळ - आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ
.  स्‍वातंत्र्योत्‍तर भारत : फाळणीचे परिणाम, संस्‍थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, नेहरूंचे अलिप्‍ततेचे धोरण, संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळ, त्‍यात सहभागी झालेले महत्‍वाचे राजकीय पक्ष व व्‍यक्‍ती, शेजारील राष्‍ट्रांशी संबंध, आंतरराष्‍ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, कृषी, उद्दोगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील प्रगती, इंदिरा गांधींच्‍या नेतृत्‍वाचा उदय, बांगला देशाची मुक्‍ती, इंदिरा गांधींच्‍या काळातील अलिप्‍तवाद, राज्‍यातील आघडीची सरकारे, विद्दयार्थ्‍यामधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ व वांशिक चळवळ
.  महाराष्‍ट्रतील निवडक समाजसुधारक - त्‍यांची विचारप्रणाली व कार्य :गोपाळ गणेश आगरकर, महात्‍मा फुले, मा. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षि शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लाकमान्‍य टिळक, महात्‍मा गांधी, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्‍णाभाऊ साठे,क्रांतीवीर नाना पाटील, लहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील.
.  महाराष्‍ट्राचा सांस्‍कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक): प्रायोगिक कला (नृत्‍य,नाटक, चित्रपट, संगीत व लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्‍य), दृश्‍य कला (वास्‍तु रचना, चित्रकला व वास्‍तुशिल्‍प ) आणि उत्‍सव,महाराष्‍ट्राच्‍या सामाजिक व मानसिक विकासावरील वाड्.मयाचा प्रभावः, भक्‍ती वाड.मय, नागरी व ग्रामीण वाड्.मय.
. भूगोल - महाराष्‍ट्रच्‍या विशेष संदर्भासह
.  प्राकृतिक भूगोल : पृथ्‍वीचे अंतरंग- रचना व प्राकृतिक जडण घडण. भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक, भूरूपिक चक्रांची संकल्‍पना -नदीसंबंधी, शुष्‍क,हिम, समुद्रतटीय चक्र यांच्‍याशी संबंधित भूरूप, भारतीय उपखंडाची उत्‍क्रांती व भूरूपवर्णन, महत्‍वाचे भूरूपकीय प्रदेश -  पूरांची समस्‍या - महाराष्‍ट्राचा भूरूपकीय तपशील. महाराष्‍ट्राची भूरूपिक वैशिष्‍टे, भारताचे त्‍यांच्‍या शेजारील राष्‍ट्राच्‍या, हिेद महासागराच्‍या, आशियाच्‍या व जगाच्‍या संदर्भातील मोक्‍याचे ठिकाण.
.  महराष्‍ट्राचा आर्थिक भूगोल : खनिजे व ऊर्जा साधनसंपत्‍ती: महाराष्‍ट्रातील खनिज संपत्‍तीचे वितरण्‍, महत्‍व व विकास, महाराष्‍ट्रातील पर्यटन - धार्मिक पर्यटन, वैद्दयकीय पर्यटन, पर्यावरणाभिमूख (इको) पर्यटन व सांस्‍कृतिक वारसा,महाराष्‍ट्रतील संरक्षित वने, अभयारण्‍ये, राष्‍ट्रीय उद्दयाने व किल्‍ले, व्‍याघ्र प्रकल्‍प.
.३ महाराष्‍ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल : जनतेचे स्‍थलांतर - कारणे व परिणाम, ऊसतोडणी कामगार साधनसंपत्‍ती व ज्‍या प्रदेशात स्‍थलांतर होते त्‍या प्रदेशावरील स्‍थलांतराचा परिणाम, महाराष्‍ट्रातील ग्रामीण वस्‍त्‍या, शहरी व ग्रामीण वस्‍त्‍यांमधील समस्‍या - पर्यावरण, गृहनिर्माण, झोपडपट्टी, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता, शहरी वाहतूक व प्रदुषण.
.  पर्यावरणीय भूगोल : परिस्थितिविज्ञान व पारिस्थितिक व्‍यवस्‍था -ऊर्जा प्रवाह, वस्‍तु चक्र, अन्‍न श्रुंखला व वेब्‍ज, पर्यावरणीय अवनती व संवर्धन,जागतिक पारिस्थितिक असमतोल - प्रदूषण व हरितगृह परिणामातील कार्बन डाय ऑक्‍साईडची व मिथेनची भूमिका, जागतिक तापमानतील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास, पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण, क्‍योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिटस, शहरी कचरा व्‍यवस्‍थापन, सागरी संरक्षित क्षेत्र एक व सागरी संरक्षित क्षेत्र दोन
.  जन, भूगोलशास्‍त्र (महाराष्‍ट्राच्‍या संदर्भात): स्‍थलांतराची कारणे व परिणाम,ग्रामीण व शहरी वसाहती - ठिकाण, परिस्थिती, प्रकार, आकारमान, मोकळया जागा व भूरूपिकीय स्‍वरूप, शहरीकरण - पक्रिया व समस्‍या, ग्रामीण - शहरी किनार, शहरी प्रभावाचे क्षेत्र, प्रादेशिक असमतोल
.  सुदूर संवेदना : सुदूर  संवेदनाची संकल्‍पना, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह कल्‍पनाचित्र, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह निर्मिती, एमएसएस बॅन्‍ड - निळा,हिरवा, लाल व लालसर रंगाच्‍या जवळचा, आभासी रंग मिश्रक (फास्‍ट कलर कॉम्‍पझिट (एफसीसी)). नैसर्गिक साधन संपत्‍तीसह सुदूर संवेदनेचा वापर करणे.भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) व जागतिक स्‍थाननिश्चिती यंत्रणा(जीपीएस) सुरू करणे.
. भूगोल व कृषि
.  कृषि परिस्थितीकी : कृषि पारिस्थितीकी व त्‍याचा मानवाशी, नैसर्गिक साधनसंपत्‍तीशी संबंध, त्‍याचे कायमस्‍वरूपी व्‍यवस्‍थापन व संवर्धन, पीक वितरण व उत्‍पादनाचे घटक म्‍हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण, पीक वाढीचे घटक म्‍हणून हवामान घटक, पर्यावरणीय प्रदूषण व पीके, प्राणी व मानव यांच्‍या संबंधातील धोके.
३.२  हवामान : वातावरण - रचना व संरचना, सौर उत्‍सर्जन व उष्‍मा समतोल,हवामानाचे घटक - तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्‍थानिक वारे, मान्‍सून, वायुराशी आणि पुरोभाग व चक्रीवादळे, भारतीय मान्‍सूनचे तंत्र, पावसाचे पुर्वानुमान,पर्जन्‍यवृष्‍टी, चक्रीवादळे, अवर्षण व पूर व हवामान प्रदेश, महाराष्‍ट्रातील पर्जन्‍यवृष्‍टीचे वितरण -अभिक्षेत्रीय व कालिक व परिवर्तनशीलता -महाराष्‍ट्राचे कृषि हवामान क्षेत्रे-अवर्षण व टंचाईची समस्‍या, अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम-कृषि,उद्दयोग व घरगुती क्षेत्रातील पाण्‍याची आवश्‍यकता, पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या,महाराष्‍ट्राच्‍या विविध कृषि हवामान क्षेत्रातील पीक प्ररूप, पीक लागवडीच्‍या पध्‍दतीतील बदलांवर उच्‍च उत्‍पन्‍नाच्‍या व कमी वेळेतल्‍या विविध प्रकारच्‍या पिकांचा प्रभाव, बहुविध पीक लागवडीची संकल्‍पना व आंतर पीक लागवड व त्‍याचे महत्‍व, सेंद्रीय शेतीची आधुनिक संकल्‍पना, वर्धनक्षम कृषि.
३.३  मृदा : मृदा - प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा तयार होण्‍याची प्रक्रिया व घटक, खनिजे आणि मातीचे सेंद्रीय घटक आणि मातीची उत्‍पादकता कायम ठेवण्‍यामधील त्‍यांची भूमिका, मातीतील आवश्‍यक असेवृक्ष लागवडीसाठीचे पोषक घटक आणि इतर लाभदायक घटक आणि समस्‍याग्रस्‍त जमिनी व त्‍या लागवडी करण्‍याच्‍या पध्‍दती, महाराष्‍ट्रातील मृदा अपक्षरण व जमीन ओसाड होण्‍याच्‍या समस्‍या, जल विभाजकाच्‍या आधारे मृद संधारणाचे नियोजन करणे,डोंगराळ, डोंगराच्‍या पायथ्‍यावरील व दरीतील जमिनीची धूप व पृष्‍ठवाह व्‍यवस्‍थापन, त्‍यांच्‍यावर परिणाम करणाऱ्या कार्यपध्‍दती व घटक.
३.४  जल व्‍यवस्‍थापन : सद्दय परिस्थिती, जल संधारणाच्‍या पध्‍दती व महत्‍व,पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेची मानके, भारतातील नद्दयांची आंतजोडणी करणे, पावसाचे पाणी साठवून ठेवण्‍याच्‍या पारंपारिक व अपारंपारिक पध्‍दती, भूजल व्‍यवस्‍थापन - तांत्रिक व सामाजिक बाबी, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्‍या पध्‍दती, संकल्‍पना व पाणलोट क्षेत्राचे व्‍यवस्‍थापन, कोरडवाहू जमिनीवरील शेती व त्‍यातील समस्‍या,पीक उत्‍पादनासंबंधात पाणी वापराची क्षमता, जल सिंचनाचे पाणी वाहून जाण्‍याचे प्रमाण कमी करण्‍याच्‍या उपाययोजना, ठिबक व तुषार जलसिंचन, पाणथळ मृदेचे जलनिस्‍सारण, कारखान्‍यातील दूषित पाण्‍याचा जमीन व पाणी यावर होणारा परिणाम.
सामान्यस अध्ययन - दोन - भारतीय संविधान व भारतीय राजकारण


सामान्‍य अध्‍यन - दोन
भारतीय संविधान व भारतीय राजकारण
(महाराष्‍ट्रच्‍या विशेष संदर्भासह) व कायदा

दर्जा : पदवी                                            एकूण गुण:१५०
प्रश्‍नपत्रिकेचे स्‍वरूप : वस्‍तुनिष्‍ठ                             कालावधी : २ तास
टीप :
() प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांचे स्‍वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्‍यक्‍ती कोणताही विशेष अभ्‍यास न करता उत्‍तरे देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्‍या  सामान्‍य ज्ञानाची चाचणी हा त्‍याचा उद्देंश आहे.
() उमेदवारांनी खाली नमूद केलेल्‍या विषयातील / उपविषयातील अद्दयावत आणि चालू घडामोंडीचा अभ्‍यास करणे अपेक्षित आहे.
------------------------------------
१. भारताचे संविधान : संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानाची ठळक वैशिष्‍टये,उद्देशिकेतील तत्‍वज्ञान (धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी), मूलभूत अधिकार व कर्तव्‍ये, राज्‍य धोरणाची निर्देशक तत्‍वे, मोफत आणि सक्‍तीचे प्राथमिक शिक्षण, सामाजिक नागरी संहिता आणि मूलभूत कर्तव्‍ये, केंद्र राज्‍य संबंध आणि नवीन राज्‍यांची निर्मिती, स्‍वतंत्र न्‍याय व्‍यवस्‍था सुधारणंची प्रक्रिया आणि संविधानातील प्रमुख सुधारणासंविधानाचा अर्थ लावताना वापरण्‍यात आलेले ऐतिहासिक न्‍यायनिर्णय, प्रमुख आयोग आणि मंडळांची रचना आणि कार्येः निवडणुक आयोग, संघराज्‍य आणि राज्‍य लोकसेवा आयोग, राष्‍ट्रीय महिला आयोग, मानवी हक्‍क आयोग, राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यांक अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आयोग - नदी पाणी विवाद निवारण मंडळ इ.
२. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व कार्ये) : भारतीय संघराज्‍याचे स्‍वरूप - संघराज्‍य व राज्‍य - विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्‍याययंत्रणा, केंद्र - राज्‍य संबंध -प्रशासकीय, कार्यकारी व वित्‍तीय संबंध, वैधानिक अधिकार,विषयांचे वाटप
() केंद्र सरकार : केंद्रिय कार्यकारी मंडळ : राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ - भारताचा महाअधिवक्‍ता - भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
(केंद्रीय विधीमंडळ :  संसद, सभापती व उपसभापती, संसदीय समित्‍या,कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण
() न्‍यायमंडळ : न्‍यायमंडळाची रचना, एकात्‍मीक न्‍यायमंडळ - कार्ये, सर्वोच्‍च न्‍यायालय व उच्‍च न्‍यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्‍यायालये - लोकपाल लाकायुक्‍त आणि लोक न्‍यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्‍यायमंडळ, न्‍यायालयातील सक्रियता. जनहित याचिका.

३. राज्‍य सरकार व प्रशासन (महाराष्‍ट्रचा विशेष संदर्भासह) : महाराष्‍ट्र राज्‍याची निर्मिती आणि पुर्नरचना, राज्‍यपाल, मुख्‍यमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्‍य सचिव, राज्‍य सचिवालय, संचालनालये, विधानसभा, विधानपरिषद - अधिकार, कार्ये व भूमिका - विधिमंडळ समित्‍या, मुंबईचा नगरपाल (शेरीफ).
४. जिल्‍हा प्रशासन : जिल्‍हा प्रशसनाचा विकास, जिल्‍हा दंडाधिकाऱ्याची बदलती भूमिकाः कायदा व सुव्‍यवस्‍था, कार्यकारी विभांगांबरोबरचे संबंध - जिल्‍हा प्रशासन व पंचायतराज्‍य संस्‍था, उपविभागीय अधिकाऱ्याची भूमिका आणि कार्ये.
५. ग्रामीण आणि नागरी स्‍थानिक शासन : ७३ व्‍या व ७४ व्‍या घटना दुरूस्‍तीचे महत्‍व, स्‍थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्‍यांची भूमिका.
() ग्रामीण स्‍थानिक शासन : जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायतीची रचना, अधिेकार व कार्य, महाराष्‍ट्रातील पंचायत राज संस्‍थेची खास वैशिष्‍टये पंचायतराज संस्‍थांच्‍या स्थितीचा अहवाल व त्‍यांच्‍या कामगिरीचे मूल्‍यन,७३ व्‍या घटनादुरूस्‍तीची महत्‍वाची वैशिष्‍टये, अंमलबजावणीतील अडचणी, प्रमुख ग्रामीण विकास कार्यक्रम आणि त्‍यांचे व्‍यवस्‍थापन.
() नागरी स्‍थानिक शासन : महानगरपालिका, नगरपरिषद आणि कटक मंडळाची रचना व कार्ये, रचना अधिकारी, साधन संपत्‍ती, अधिकार - कार्ये आणि नियंत्रण,७४ व्‍या घटनादुरूस्‍तीची महत्‍वाची वैशिष्‍टयेः अंमलबजावणीतील समस्‍या, प्रमुख नागरी विकास कार्यक्रम व त्‍यांची व्‍यवस्‍थापन.
६. शिक्षण पध्‍दती : राज्‍य धोरण व शिक्षण याविषयीची निर्देशक तत्‍वे, वंचित घटक - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व महिला यांचे शिक्षणविषयक प्रश्‍न, शिक्षणाचे खाजगीकरण - शिक्षणाच्‍या प्रांतात प्रवेश,गुणवत्‍ता, दर्जा व सामाजिक न्‍याय यासंबंधीचे मुद्दे ; उच्‍च शिक्षणातील आजची आव्‍हाने, सर्व शिक्षा अभियान, माध्‍यमिक शिक्षा अभियान.
७. पक्ष आणि दबाव गट : पक्ष पध्‍दतीचे स्‍वरूप - राष्‍ट्रीय पक्षांची भूमिका - विचारप्रणाली, संघटन व निवडणुकीतील कामगिरी - राजकीय पक्ष व त्‍यांचे सामाजिक अधिष्‍ठान, प्रादेशिकतावाद - प्रादेशिक पक्षांचा उदय - विचारप्रणाली,संघटन व निवडणुकीतील कामगिरी, महाराष्‍ट्रतील प्रमुख दबाव गट व हितसंबंधित गट - त्‍यांची भूमिका व धोरण निर्धारणावर त्‍यांचा होणारा परिणाम ;महाराष्‍ट्रातील समाज कल्‍याण कार्यक्रम, महिला व बालक, कामगार व युवक,अशासकीय संघटन व समाज कल्‍याणामधील त्‍यांची भूमिका.

८. प्रसार माध्‍यमे : मुद्रण व इलेकट्रॉनिक प्रसार माध्‍यमे - धोरण निर्धारावर त्‍यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे, भारतीय वृत्‍तपत्र परिषद (प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया) ; भारतासारख्‍या धर्मनिरपेक्ष लोकशाहीमधील जनसंपर्क प्रसारमाध्‍यमांसाठी आचारसंहिता, मुख्‍य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारमाध्‍यमांमधील महिलांचा सहभाग: वस्‍तुस्थिती व मानके, भाषण व अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्य आणि त्‍यावरील प्रसारमाध्‍यमांमधील महिलांचा सहभागः वस्‍तुस्थिती व मानके ; भाषण व अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्य आणि त्‍यावरील मर्यादा.
९. निवडणूक प्रक्रिया : निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्‍टये - एक सदस्‍यीय प्रादेशिक मतदारसंघ, दुर्बल घटकांकरिता राखीव मतदारसंघ, प्रौढ मताधिकार - निवडणूक आयोगाची भूमिका - सार्वत्रिक निवडणुका - प्रमुख कल -  मतदान वर्तनाचे स्‍वरूप आणि मतदान वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक - खुल्‍या व निःपक्ष वातावरणात निवडणुका घेण्‍यामधील समस्‍या व अडचणी - निवडणूकविषयक सुधारणा - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे.
१०. प्रशासनिक कायदा : कायदयाचे राज्‍य, प्रशासकीय स्‍वेच्‍छानिर्णय आणि त्‍याचे नियंत्रण व न्‍यायिक आढावा. प्रशासनिक न्‍यायाधिकरणे, त्‍यांची स्‍थापना व कार्यशीलता, नैसर्गिक न्‍यायाची तत्‍वे.
११. केंद्रसरकारचे व राज्‍य शासनाचे विशेषधिकार : भारतीय साक्षीपुरावा अधिनियमाचे कलम १२३, शासकीय गुपिते अधिनियम, माहितीचा अधिकार आणि शासकीय गुपिते अधिनियमावर त्‍याचा होणारा परिणाम.
१२. काही सुसंबध्‍द कायदे :
(पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ : उद्दिष्‍टे, यंत्रणा व त्‍यात दिलेल्‍या उपाययोजना.
(ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ : व्‍याख्‍या - ग्राहक विवाद - निवारण यंत्रणा
() माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ : अपीलकर्त्‍याचे अधिकार, सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्‍य, माहितीमधील अपवाद.
() माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (सायबरविषयक कायदा) : व्‍याख्‍या - प्राधिकरणे -  अपराध
() भ्रष्‍टाचार प्रतिबंध अधिनियम : उद्दिष्‍ट, यंत्रणा व त्‍यात दिलेल्‍या उपाययोजना.
() अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम,१९८९ : उद्दिष्‍ट, यंत्रणा व त्‍यात दिलेल्‍या उपाययोजना.
७. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्‍याचार प्रतिबंध) नियम १९९५ :उद्दिष्‍ट,   यंत्रणा व त्‍यात दिलेल्‍या उपाययोजना.
८. नागरी हक्‍क संरक्षण अधिनियम, १९५५ : उद्दिद्द्ष्‍ट, यंत्रणा व त्‍यात दिलेल्‍या         उपाययोजना.
१३. समाज कल्‍याण व सामाजिक विधिविधान : सामाजिक बदलाचे साधन म्‍हणून सामाजिक विधिविधान; मानवी हक्‍क; भारताचे संविधान व फौजदारी कायदा (फौजदारी प्रक्रिया संहिता) घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) अधिनियम, नागरी हक्‍क संरक्षण अधिनियम, १९५५, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्‍याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, आणि माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत महिलांना संरक्षण.
१४. सार्वजनिक सेवा : अखिल भारतीय सेवा, सांविधानिक दर्जा, भूमिका व कार्ये,केंद्रीय सेवाः स्‍वरूप व कार्येः केद्रीय लोकसेवा आयोग ; राज्‍य सेवा व महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोग; शासन व्‍यवहाराच्‍या बदलत्‍या संदर्भात प्रशिक्षण - यशदा,लाल बहादूर शास्‍त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्‍लभभाई पटेल राष्‍ट्रीय पोलीस अकादमी.
१५. सरकारी खर्चावर नियंत्रण : संसदीय नियंत्रण, अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रमांवरील समिती, भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक(कॅग) यांचे कार्यालय, पैसाविषयक व राजकोषीय धारेणामधील वित्‍त मंत्रालयाची भूमिका, महा लेखापाल, महाराष्‍ट्र यांची रचना व कार्य.
सामान्‍य अध्‍ययन तीन मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्‍क

सामान्‍य अध्‍ययन तीन
मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्‍क

दर्जा : पदवी                                                     एकूण गुण :१५०
प्रश्‍नपत्रिकेचे स्‍वरूप : वस्‍तुनिष्‍ठ                                        कालावधी : २ तास
टीप :
() प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांचे स्‍वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्‍यक्‍ती कोणताही विशेष अभ्‍यास न करता उत्‍तर देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्‍या सामान्‍य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्‍यांचा उद्देश आहे.
() उमेदवारांनी खाली नमूद केलेल्‍या विषयातील / उपविषयातील अद्दयावत आणि चालू घडामो्डींचा अभ्‍यास करणे अपेक्षित आहे.
-----------------------------------------
१. मानव संसाधन विभाग
१.१ भारतातील मानव संसाधन विकास : भारतातील लोकसंख्‍येची सद्दयस्थिती - संख्‍यात्‍मक स्‍वरूप (आकारमान आणि वाढ - लिंग, वय नागरी आणि ग्रामीण)आणि गुणात्‍मक स्‍वरूप (शिक्षण व आरोग्‍य विषयक काळजी), लोकसंख्‍याविषयक धोरण आणि २०५० पर्यंतच्‍या  योजना, आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनामध्‍ये अंतर्भूत असलेले घटक आणि कारणीभूत गोष्‍टी, भारतातील बेरोजगारीचे स्‍वरूप, प्रकार आणि समस्‍या भारतातील सेवायोजनाचा कल, विभिन्‍न विभागातील व क्षेत्रातील कुशल कामगारांचे मागणी दर, मनुष्‍यबळ विकासाकरिता कार्यरत असलेल्‍या शासकीय आणि स्‍वयंसेवी संघटना उदा.एनसीईआरटी,एनआयईपीए, विद्दयापीठ अनुदान आयोग (युजीसी), मुक्‍त विद्दयापीठे,एआयसीटीई, एनसीटीई, आयटीआय, एनसीव्‍हीटी आयएमसी इत्‍यादी, मानव संसाधन विकासाशी संबंधित समस्‍या आणि बाबी, शासनाचे नोकरीविषयक धोरण,बेरोजगारी आणि न्‍यून बेरोजगारी कमी करण्‍यासाठी विविध योजना. 
१.२ शिक्षण : मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्‍हणून शिक्षणाचा विचार, भारतातील (पूर्व प्राथमिक ते उच्‍च शिक्षण ) शिक्षण प्रणाली(शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्‍यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्‍यादी ) समस्‍या आणि प्रश्‍न, मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्‍टया व आर्थिकदृष्‍टया गरीब वर्ग, अधू अल्‍पसंख्‍य, कौशल्‍य शोध इत्‍यादी, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्‍वयंसेवी संस्‍था, ई - अध्‍ययन, जागतिकीकरण आणि खाजगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम, राष्‍ट्रीय ज्ञान आयोग, राष्‍ट्रीय उच्‍च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी.
१.३ व्‍यावसायिक शिक्षण : मानव संसाधन विकासाचे साधन म्‍हणून व्‍यावसायिक शिक्षणाचा विचार, व्‍यावसायिक / तंत्र शिक्षण - भारतातील, विशेषतः महाराष्‍ट्रातील सद्दस्थिती, शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, शास‍कीय धोरणे, योजना व कार्यक्रम - समस्‍या, प्रश्‍न व त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न, व्‍यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्‍वीकृती देणाऱ्यासंस्‍था.
१.४ आरोग्‍य : मानव संसाधन विकासाचा अत्‍यावश्‍यक आणि प्रमुख घटक म्‍हणून आरोग्‍याचा विचार, जीवनविषयक आकडेवारी, जागतिक आरोग्‍य संघटना - उद्देश,रचना, कार्ये व कार्यक्रम, भारतामध्‍ये शासनाची आरोग्‍यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, आरोग्‍य विषयक काळजी घेणारी यंत्रणा, आरोग्‍याशी संबंधित समस्‍या आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी करावयाचे प्रयत्‍न, जननी - बाल सुरक्षा योजना, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान.
१.५ ग्रामीणविकास : पंचायत राज व्‍यवस्‍थेला अधिकार प्रदान करणे, ग्राम पंचायत आणि ग्रामविकासातील तिची भूमिका, जमीन सुधारणा व विकास,ग्रामविकासातील सहकारी संस्‍थांची भूमिका, ग्रामविकासामध्‍ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तिय संस्‍था, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण, राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
२. मानवी हक्‍क :
२.१ जागतिक मानवी हक्‍क प्रतिज्ञापत्र (युडीएचआर १९४८) : मानवी हक्‍काची आंतरराष्‍ट्रीय मानके, त्‍याचे भारताच्‍या संविधानातील प्रतिबिंब, भारतात मानवीहक्‍क राबविण्‍याची आणि त्‍याचे संरक्षण करण्‍याची यंत्रणा, भारतातील मानवी हक्‍क चळवळ, मानवी हकापासून वंचित असलेल्‍यांच्‍या समस्‍या जसे गरीबी, निरक्षरता, बरोजगारी, सामाजिक - सांस्‍कृतिक - धार्मिक प्रथा, हिंसा,भ्रष्‍टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, हवालतीतील गुन्‍हेगारी इत्‍यादी.लोकशाही चौकटीत मानवी हक्‍क आणि मानवी सभ्‍यतेचे पालन करण्‍यासाठी प्रशिक्षण देण्‍याची गरज, जागतिकीकरण आणि त्‍याचा विभिन्‍न क्षेत्रावरील परिणाम, मानवी विकास निर्देशांक, बालमृत्‍यू प्रमाण, लिंग गुणोत्‍तर.
२.२ बाल विकास : समस्‍या व प्रश्‍न (अर्भक मृत्‍युसंख्‍या, कुपोषण, बाल कामगार,मुलांचे शिक्षण इत्‍यादी) - शासकीय धोरणे, कल्‍याण योजना आणि कार्यक्रम - आंतरराष्‍ट्रीय अभिकरणे, स्‍वयंसेवी संघटना, सामूहिक साधने यांची भूमिका,लोककल्‍याणामध्‍ये लोकांचा सहभाग.
२.३ महिला विकास : समस्‍या व प्रश्‍न (स्‍त्री-पुरूष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, स्‍त्री अर्भक हत्‍या/ स्‍त्रीभ्रुण हत्‍या, महिलांचे सबलीकरण इत्‍यादी) - शासकीय धोरण, विकास / कल्‍याण व सबलीकरण यासाठीच्‍या योजना व कार्यक्रम, आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि सामूहिक साधने, लोकविकासामध्‍ये लोकांचा सहभाग, आशा.
२.४ युवकांचा विकास : समस्‍या व प्रश्‍न ( बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्‍यसन इत्‍यादी) - शास‍कीय धोरण - विकास योजना व कार्यक्रम - आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि सामूहिक साधने, लोकविकासातील लोकांचा सहभाग
२.५ आदिवासी विकास : समस्‍या व प्रश्‍न ( कुपोषण, अलिप्‍तता, एकात्‍मीकरण व विकास इत्‍यादी- आदिवासी चळवळ - शासकीय धोरण. कल्‍याण योजना व कार्यक्रम - आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवी संघटना व सामूहिक साधने यांची भूमिका, लोककल्‍याणामध्‍ये लोकांचा सहभाग.
२.६ सामाजिकदृष्‍टया वंचित वर्गाचा विकास (.जा.,वि.जा/ भ.., इतर मागासवर्ग इत्‍यादी) : समस्‍या व प्रश्‍न (संधीतील असमानता इत्‍यादी) - शासकीय धोरण, कल्‍याण योजना व विकास कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवा संघटना व साधन संपत्‍ती संघटित करून कामी लावणे व सामूहिक सहभाग.
२.७ वयोवृध्‍द लोकांचे कल्‍याण : समस्‍या व प्रश्‍न - शासकीय धोरण - कल्‍याण योजना व कार्यक्रम, आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवी संघटना यांची भूमिका आणि वयोवृध्‍दांच्‍या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्‍ये त्‍यांच्‍या सेवांचे उपयोजन.
२.८ कामगार कल्‍याण : समस्‍या व प्रश्‍न (कामाची स्थिती, मजुरी, आरोग्‍य आणि संघटीत व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्‍या) - शासकीय धोरण, कल्‍याण योजना व कार्यक्रम - आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, समाज व स्‍वयंसेवी संघटना.
२.९ विकलांग व्‍यक्‍तींचे कल्‍याण : समस्‍या व प्रश्‍न (शैक्षणिक व रोजगार संधी यामधील असमानता इत्‍यादी) - शासकीय धोरण, कल्‍याण योजना व कार्यक्रम - रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था, स्‍वयंसेवी संघटना यांची भूमिका.
२.१० लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्‍प व नैसर्गिक आपत्‍ती यांमुळे बाधित लोक) : कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम - कायदेविषयक तरतुदी - आर्थिक, सांस्‍कृतिक,सामाजिक, मानसशास्‍त्रीय इत्‍यादीसारख्‍या नि‍रनिराळया पैलूंचा विचार.
२.११ आंतरराष्‍ट्रीय व प्रादेशिक संघटना : संयुक्‍त राष्‍ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे- युएनसीटीएडी, युएनडीपी, आयसीजे, आयएलओ, युनेस्‍को,युएनसीएचआर, इयु, अॅपेक, एशियन, ओपेक, ओएयु, सार्क, नाम, राष्‍ट्रकुल राष्‍ट्रे(कॉमनवेल्‍य ऑफ नेशन्‍स) आणि युरोंपियन युनियन.
२.१२ ग्राहक संरक्षण : विद्दयमान अधिनियमाची ठळक वैशिष्‍टये - ग्राहकांचे हक्‍क - ग्राहक विवाद व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार - उद्दिष्‍टये, अधिकार,कार्ये, कार्यपध्‍दती, ग्राहक कल्‍याण निधी.
२.१३ मूल्‍ये व नीतीतत्‍वे : कुटूंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्‍यमे इत्‍यादी यांसारख्‍या औपचारिक व अनौपचारिक संस्‍थांमार्फत सामाजिक मानके, मुल्‍ये, नीतीतत्‍वे यांची जोपासना करणे.
सामान्‍य अध्‍ययन - चार - अर्थव्‍यवस्‍था व नियोजन
·          

सामान्‍य अध्‍ययन - चार
अर्थव्‍यवस्‍था व नियोजन, विकासाविषयक अर्थशास्‍त्र आणि कृषि,विज्ञान व तंत्रज्ञान विकास


दर्जा
 : पदवी                                                   एकुण गुण : १५०
प्रश्‍नपत्रिकेचे स्‍वरू :वस्‍तुनिष्‍ठ                               कालावधीः २ तास
टीप :

(
) प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांचे स्‍वरूप व दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्‍यक्‍ती कोणताही विशेष अभ्‍यास न करता उत्‍तरे देऊ शकेल, आणि विविध विषयातील उमेदवाराच्‍या सामान्‍य ज्ञानाची चाचणी घेणे,हा त्‍यांचा उद्देश आहे.
() उमेदवारांनी, खाली नमूद केलेल्‍या विषयातील / उपविषयातील अद्दयावत आणि चालू घडामोडींचा अभ्‍यास करणे अपेक्षित आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
१. अर्थव्‍यवस्‍था व नियोजन-
१.१ भारतीय अर्थव्‍यवस्‍था : भारतीय अर्थव्‍यवस्‍थेमधील आव्‍हाने - गरिबी,बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन : प्रक्रिया प्रकार, भारताच्‍या पहिल्‍या ते दहाव्‍या पंचवार्षिक योजनांचा आढावा, मूल्‍यमापन, विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशक, राज्‍य व स्‍थानिक स्‍तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण - संविधानातील ७३ वी व ७४ वी सुधारणा.
१.२ नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास : गरजा व महत्‍व, ऊर्जा,पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता, गृहनिर्माण, परिवहन (रस्‍ते, बंदरे इ.) संसूचना (टपाल व तारायंत्र, दूरसंचार ), रेडिओचे नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल अशा सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ व विकास, भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेचप्रसंग व समस्‍या, धोरण, पर्याय सरकारी - खाजगी क्षेत्रातील भागीदारी (पीपीपी), भारतीय वित्‍त विकास व पायाभूत सुविधांचा विकास - पायाभूत सुविधांच्‍या विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधांच्‍या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्‍य शासनाची धोरणे, परिवहन व गृहनिर्माण (नागरी व ग्रामीण) समस्‍या - केंद्र  सरकारचे व राज्‍य शासनाचे उपक्रम व कार्यक्रम,बीओएलटी (बांध, वापरा, भाडेपट्टयाने दया, हस्‍तांतरीत करा) व बीओटी ( बांधा,वापरा व हस्‍तांतरीत करा) योजना.
१.३ उदयोग गरजा : आर्थिक व सामाजिक विकासात उद्दयोगाचे महत्‍व व भूमिका वाढीचा आकृतिबंध, विशेषतः महाराष्‍ट्राच्‍या संदर्भात भारतातील मोठया उदयोगांची संरचना, लघुउदयोग, कुटीर व ग्रामोद्दयोग, त्‍यांच्‍या समस्‍या व दृष्‍टीकोन, शिथिलीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्दयोगांवरील परिणाम, लघुउद्दयोगांचा विकास, प्रचालन व संनियंत्रण यांकरिता महाराष्‍ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघुउद्दयोग व कुटीर उद्दयोग यांची निर्माण संभाव्‍यता, विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड), एसजीवीएस.
१.४ सहकार : सहकाराची संकल्‍पना, अर्थ समुदिष्‍ट, जुनी व नवीन तत्‍वे,भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, महाराष्‍ट्रातील सहकारी संस्‍था - प्रकार, भूमिका, महत्‍व व विविधीकरण, राज्‍यधोरण व सहकार क्षेत्र - विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्‍ट्रातील सहकार चळवळीचा आढावा, सुधारणा व भवितव्‍य - कृषि पणन यातील पर्यायी धोरणविषयकव उपक्रमशीलता - रोजगार हमी योजना.
१.५ आर्थिक सुधारणा : पार्श्‍वभूमी, शिथीलीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण -  (संकल्‍पना, अर्थ, व्‍याप्‍ती व मर्यादा), केंद्र व राज्‍य स्‍तरावरील आर्थिक सुधारणा, जागतिक व्‍यापार संघटनेची मुदत, तरतुदी व त्‍यांची अंमलबजावणी आणि भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील त्‍याचा परिणाम व समस्‍या
१.६ आंतरराष्‍ट्रीय व्‍यापार व आंतरराष्‍ट्रीय  भांडवली चळवळ :जागतिकीकरणाच्‍या युगात उदयास आलेला कल, भारतीय जागतिक व्‍यापाराची वाढ, रचना व निर्देश, भारताचे विदेश व्‍यापार धोरण - निर्मितीचे प्रचालन,जागतिक व्‍यापार संघटना व आंतरराष्‍ट्रीय व्‍यापार - विदेशी भांडवल, अंतर्देशी प्रवाह - रचना व वाढ एफडीआय ( भारतीय वित्‍त विकास) ई - वाणिज्‍य,बहूराष्‍ट्रीय वित्‍तव्‍यवस्‍था, अभिकरणांची भूमिका (आंतरराष्‍ट्रीय नाणे निधी),जागतिक बॅंक व आंतरराष्‍ट्रीय विकास अभिकरण, आंतरराष्‍ट्रीय पत आकारणी.
१.७ गरिबीचे निर्देशांकन व अंदाज : दारिद्रय रेषा-संकल्‍पना व वस्‍तुस्थिती,दारिद्रय रेषेखालील, दारिद्रय निर्मुलनाच्‍या उपाययोजना-भारतातील जननक्षमता,विवाह दर, मृत्‍युसंख्‍या व रोगटपण-लिंग सक्षमीकरण धोरण.
१.८ रोजगार निर्धारणाचे घटक : बेरोजगारी संबंधात उपाययोजना - उत्‍पन्‍न,दारिद्रय व रोजगार यांच्‍यामधील संबंध - वितरणसंबंधात प्रश्‍न व सामाजिक न्‍याय.
१.९ महाराष्‍ट्राची अर्थव्‍यवस्‍था : कृषि, उद्दयोग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्‍टये - महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ व्‍यवस्‍थापन - महाराष्‍ट्रातील एफडीआय.
२. विकास व कृषि यांचे अर्थशारूत्र
२.१ समष्टि अर्थशास्‍त्र : राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न लेखांकनाच्‍या पध्‍दती- पैशांची कार्ये- आधार पैसा- जननक्षम पैसा- पैशाचा संख्‍या सिध्‍दांत - पैसा गुणक, चलनवाढीचे पैसाविषयक व पैसाव्‍यतिरिक्‍त सध्‍दांत- चलनवाढ निंयंत्रणः चलन विषयक,आर्थिक आणि थेट उपाययोजना
२.२ सार्वजनिक वित्‍तव्‍यवस्‍था आणि वित्‍तीय संस्‍था : पणन अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये सार्वजनिक वित्‍तव्‍यवस्‍थेची भूमिका - सरकारी गुंतवणुकीचे निकषगुण वस्‍तू व सार्वजनिक वस्‍तू -  महसुलीचे स्‍त्रोत व खर्च (केंद्र व राज्‍य) - करांचे स्‍वरूप आणि अर्थसहाय्य आणि त्‍यांचा भार व परिणाम - केंद्राचे व भारतातील राज्‍यांचे कर, करेतर व सरकारी ऋण. सरकारी खर्च (केंद्र व राज्‍ये) - वाढ व त्‍याची कारणे - सरकारी खर्च सुधारणा - कामगिरी आधारित अर्थसंकल्‍पन- शून्‍याधारित अर्थसंकल्‍प शुन्‍याधारित अर्थसंकल्‍प- अर्थसंकल्‍पीय तुटीचे प्रकार - देशांतर्गत आणि देशाबाहेरील कर्ज, राष्‍ट्रीय व राज्‍य स्‍तरावरील कर सुधारणांचे पुनर्विलोकन - मूल्‍यवर्धित कर. सरकारी ऋण - वाढ, रचना व भार, केंद्राला असणारी राज्‍याची कर्जाची समस्‍या, राजकोषीय तूट- तुटींची संकल्‍पना आणि नियंत्रण - केंद्र, राज्‍य आणि भारतीय रिझर्व्‍ह बॅंकेचा पुढाकार, भारतातील राजकोषीय सुधारणा - केंद्र व राज्‍य स्‍तरावरील आढावा, वित्‍तीय क्षेत्र सुधारणा- बॅंकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह - खरेखुरे आणि नाममात्र व्‍याजदर- रेपो आणि प्रतिकूल रेपो व्‍यवहार.
२.३ वाढ, विकास व आंतरराष्‍ट्रीय अर्थशास्‍त्र :
() विकास निदर्शक : सातत्‍यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरित स्‍थूल,देशांतर्गत उत्‍पन्‍न,
() आर्थिक विकासाचे घटक : नैसर्गिक साधनसंपत्‍ती, लोकसंख्‍या, मानवी भांडवल, पायाभूत सुविधा-लोकसंख्‍या शास्‍त्रीय संक्रमणाचा सिध्‍दांत- मानवी विकास निर्देशांक - मानवी दारिद्रय निर्देशांक - लिंग सक्षमीकरण उपाययोजना.
() वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्‍ट्रीय महामंडळे.
() वाढीचे इंजिन म्‍हणून आंतरराष्‍ट्रीय व्‍यापार - आांतरराष्‍ट्रीय व्‍यापाराचे सिध्‍दांत.
() आयएमएफ - आयबीआरडी - डब्‍ल्‍यूटीओ - प्रादेशिक व्‍यापार करारनामा - सार्क- एएसईएएन
२.४ भारतीय कृषिव्‍यवस्‍था, ग्राम विकास व सहकार :
() आर्थिक विकासातील कृषिक्षेत्राची भूमिका - कृषि, उद्दयोग व सेवाक्षेत्रे यांच्‍यामधील आंतरसंबंध- कंत्राटी शेती - ठराविक शेती - औदयागिक शेती - सेंद्रीय शेती.
() धारण केलेल्‍या जमिनीचा आकार आणि उत्‍पादकात - हरित क्रांती व तंत्रशास्‍त्रविषयक बदल- कृषिविषयक किंमती आणि व्‍यापाराच्‍या अटी - शेतीला अर्थसहाय्य- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था- अन्‍नसुरक्षा.

() भारतातील कृषि उत्‍पन्‍न वाढीतील प्रादेशिक तफावत - कृषिविषयक धंदा व जागतिक बाजरपेठ भारतातील कृषिविषयक पतवारी.

Download Syllabus In PDF(Marathi)

State Service Main Examination-Revised Syllabus-2016 ( English)

No comments:

Post a Comment

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा