डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो
म्हणाला होता, 'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश मिळण्याची अजिबात शक्यता
नसतानादेखील यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'
स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.
या वर्षांची परीक्षा फारच महत्त्वाची आहे, कारण या वर्षी म्हणजे २०१२ मध्ये जवळजवळ १६ वर्षांनंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे. या वर्षांपासून पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-
१) महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ
३) राज्य पद्धती व प्रशासन
४) आíथक आणि सामाजिक विकास
५) पर्यावरण
६) सामान्य विज्ञान
सन २०११ - २०१२ याच अभ्यासक्रमावर झालेल्या परीक्षेचा विचार केल्यास या अभ्यासक्रमाचा आवाका आपल्या लक्षात येईल.
१) चालू घडामोडी :
कोणत्याही स्पर्धापरीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धापरीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धापरीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात चालू घडामोडीच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी बाजारात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांवर फक्त अवलंबून न राहता रोज कमीतकमी एक तास याचा योजनाबद्ध अभ्यास करावा. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोटबुक तयार करून रोजच्या रोज टिपण काढल्यास सर्वात जास्त फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून (उदा. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरुक्षेत्र इ.) टिपणे काढावीत.
१) आंतरराष्ट्रीय घडामोडी
२) राष्ट्रीय घडामोडी उदा. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी इ.
३) राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
४) आíथक घडामोडी
५) पर्यावरण क्षेत्रातील घडामोडी
६) वैज्ञानिक घडामोडी
७) कृषी क्षेत्रातील घडामोडी
८) क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
९) विविध करार, पुरस्कार, समित्या, दिनविशेष इ.
चालू घडामोडीची तयारी रोज करावी. परीक्षेला अवघे काही दिवस राहिले असताना या विषयाची तयारी करण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ उडण्याची जास्त शक्यता आहे.
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ
तसे पाहिल्यास या विषयाची व्याप्ती मोठी आहे. कारण जर इतिहास म्हटला तर त्याचे पुढील भाग पडतात. १) प्राचीन भारताचा इतिहास २) मध्ययुगीन भारताचा इतिहास ३) आधुनिक भारताचा इतिहास ४) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ.
सन २०११-२०१२ च्या संघ लोकसेवा परीक्षेचा आधार घेतल्यास साधारणत: भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीवर जास्त प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेलासुद्धा हा विभाग आहे म्हणून याचा अभ्यास पूर्वपरीक्षेपासून विस्तृत केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
संदर्भ ग्रंथ : बिपिन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एन.सी. ई.आर.टी.ची इतिहासाची पुस्तके.
याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन अभ्यास करावा. जर इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सणावळय़ा इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.
३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल
एम.पी.एस.सी.च्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमात
फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता; मात्र बदलेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागच्या एक वर्षांच्या विविध परीक्षांचा अभ्यास केला, तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येईल, तो म्हणजे भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारले जातात, याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परीक्षार्थीना महाराष्ट्राचा व भारत आणि जग याचा अॅटलास घेणे आवश्यक आहे व अॅटलास समोर ठेवून अभ्यास करावा. या परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल तसेच भारताचा भूगोल व्यवस्थित अभ्यासावा.
संदर्भ ग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल सवदी तसे एन.सी.ए. आर.टी. चे पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत.
जगाच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील
वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा, जेणेकरून अभ्यास सोपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका- कॅनडा- दक्षिण अमेरिका इत्यादी; युरोप खंड, आफ्रिका खंड.
संदर्भ ग्रंथ : जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्यक वाचावे.
४) पर्यावरण :
मागच्या दोन वर्षांच्या यूपीएससीच्या पेपरचा अभ्यास केल्यास लक्षात येईल की, या घटकावर कमीत कमी २० प्रश्न विचारले गेले आहेत. हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार
घ्यावा.
१) वातावरणातील बदल
२) जैवविविधता
३) परिस्थितिकी
४) ग्लोबल वाìमग
५) कार्बन क्रेडिट
६) बायोस्पेअर रिझव्र्ह
७) नॅशनल पार्क
८) ओझोन थराचा क्षय
९) बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट
त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा उदा. रिओ परिषद, कॅन्कून परिषद इत्यादी.
५) भारतीय व महाराष्ट्रातील राज्यपद्धती व प्रशासन :
यूपीएससीने मागे घेतलेल्या सी-सॅट परीक्षेत जवळजवळ २५ ते ३० प्रश्न या घटकावर विचारले होते. या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचादेखील संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे लिहून ती परत परत वाचावीत, निरनिराळय़ा घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३ वी घटना दुरुस्ती, ७४ वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग व त्यांची कार्ये, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी. केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्या यांचा अभ्यास करावा.
संदर्भ ग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भालभोळे, घांगरेकर यांची पुस्तके.
६) आíथक व सामाजिक विकास :
या वर्षी अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कारण यूपीएससीने गेल्या २ वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत जवळजवळ ३० ते ३५ प्रश्न या घटकावरच विचारलेले आहेत. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात; त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, करप्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगारनिर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. याशिवाय वरील अभ्यासाची सांगड खालील मुद्दय़ांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होईल.
१) शाश्वत विकास
२) लोकसंख्या
३) सामाजिक क्षेत्र
४) भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इत्यादी.
संदर्भ ग्रंथ : इंडिया इअर बुक २०१३ अजून बाजारात यायचे आहे.
दत्त आणि सुंदरम् किंवा भारतीय आíथक व्यवस्था (विशेषांक) प्रतियोगिता दर्पण.
७) सामान्य विज्ञान :
सामान्य विज्ञानात प्रश्न १) जीवशास्त्र २) भौतिक शास्त्र ३) रसायन शास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतची एन.सी.ई.आर.टी.ची पुस्तके यांचा अभ्यास करावा. जीवशास्त्र व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यातील शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणी विज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे, व्हिटामिन्स, विटामिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.
मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहात. दरवर्षी जवळजवळ चार ते पाच लाख विद्यार्थी या परीक्षेत आपले नशीब आजमावतात. यशस्वी व्हायचे असेल तर शंभर
टक्के नव्हे तर एकशे दोन टक्के प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कोणत्याही एकाच घटकावर जास्त वेळ न घालवता सर्व घटक व्यवस्थित समजून त्यांचा अभ्यास करावा. पूर्ण अभ्यासाला चालू घडामोडीचा आधार द्यावा. तयारीदरम्यान कोणत्याही क्षणी नाराज न होता स्वत:चे प्रयत्न सातत्याने चालू ठेवावे, तरच यश प्राप्त होईल.---

बुद्धिमापन, तार्किक
युक्तिवाद, विश्लेषणात्मक
क्षमता आणि सामग्री विश्लेषण
MPSC पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात नागरी
सेवा कल चाचणी हा दुसरा
पेपर समाविष्ट केला आहे. ज्यात बुद्धिमापन, तार्किक
युक्तिवाद, विश्लेषणात्मक
क्षमता आणि सामग्री विश्लेषण या घटकांचा समावेश आहे.
अंकगणित, त्यातील
मूलभूत प्रक्रिया व सूत्रे, तर्कनिष्ठ
विचारपद्धती, आकडेवारीचे
सादरीकरण व विश्लेषण या गणितीय स्वरूपाच्या बुद्धिमापन कौशल्याची तपासणी या
घटकांद्वारे केली जाणार आहे. अर्थात यासाठी दहावीचा दर्जा हे मानक गृहीत धरले आहे.
त्यामुळे विदय़ार्थ्यांनी विशेषत: दहावीनंतर गणिताशी संपर्क नसलेल्या विदय़ार्थ्यांनी
याबाबत भय बाळगण्याचे कारण नाही.
बुद्धिमापन
चाचणी
वस्तुत: यातील बुद्धिमापन
चाचणी हा घटक पूर्वी सामान्य अध्ययनात समाविष्ट होता. मात्र तेव्हा याकडे दुर्लक्ष
करणे शक्य होते. आता सीसॅट या पेपरमध्ये समावेश केल्यामुळे या घटकाची तयारी अटळ
बनली आहे. बुद्धिमापन हा घटक अंकगणिताशी संबंधित आहे. यूपीएससीच्या यापूर्वीच्या
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास १४ ते १५ प्रकारची उदाहरणे अधोरेखित करता
येतात. हे प्रकार मूलत: बेरीज,
वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत गणितीय
प्रक्रियांवर आधारित आहेत. संख्येचे प्रकार, संख्येचे वर्ग, वर्गमूळ; घन, घनमूळ; शेकडेवारी, अपूर्णाक; सरासरी, नफा-तोटा; गुणोत्तर प्रमाण; काळ-काम-वेग आणि समीकरणे या
बाबींवर आधारित उदाहरणे परीक्षेत विचारली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत
गणितीय कौशल्ये अवगत केली पाहिजेत. गणितीय प्रक्रियांमधील सूत्रेदेखील लक्षात
ठेवली पाहिजेत. या मूलभूत पायाभरणीनंतर बुद्धिमापन या घटकात जे १४ ते १५ प्रकार
समाविष्ट होतात, त्यांचा
टप्प्याटप्प्याने अभ्यास करावा. एकेक प्रकार निवडून त्यातील प्रक्रिया समजून
घ्यावी. त्याच्याशी संबंधित एखादे सूत्र लक्षात ठेवावे आणि त्या प्रकारच्या
उदाहरणांचा भरपूर सराव करावा. प्रश्नाचे उत्तर शोधताना पर्यायांचा विचार करणे
अत्यावश्यक ठरते. विविध प्रकारच्या या उदाहरणांची तयारी करताना प्रत्येक उदाहरणात
अंतर्भूत गणितीय पायऱ्या लक्षात घ्याव्यात. मात्र नंतर थेट उत्तरापर्यंत जाण्याचे
कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. कारण प्रत्यक्ष पेपर सोडवताना या सर्व गणितीय
पायऱ्यांचा विचार करून उदाहरणाची उकल करण्यासाठी आवश्यक वेळ प्राप्त होत नाही. वेळ
हा घटक निर्णायक ठरणार असल्याने जलद गतीने उदाहरणे सोडवण्याचे कौशल्य विकसित केले
पाहिजे.
बुद्धिमापनावर आधारित
प्रश्नांच्या तयारीत भरपूर प्रश्नांचा सराव आणि सातत्यपूर्ण सराव ही बाब निर्णायक
ठरणार आहे. दोन ते अडीच महिने दैनंदिन पातळीवर एक ते दीड तासांचा वेळ निर्धारित
करून या घटकाची तयारी करावी.
यासाठी CENP ची ८ ते
१० ही मूलभूत पुस्तके आणि वा ना
दांडेकर चे सामान्य क्षमता चाचणी स्पेक्ट्रम किंवा टाटा
मॅकग्राहील प्रकाशनाची गाईड्स संदर्भ म्हणून वापरावीत.
तार्किक
युक्तिवाद क्षमता
तार्किक क्षमतेत सर्वसाधारण विधान वा तत्त्व, सोदाहरण स्पष्टीकरण, विशिष्ट नियमावर आधारित तर्क व योग्य अनुमान या घटकांचा समावेश होतो. दिलेल्या विधानाच्या आधारे शिस्तबद्धरीत्या निष्कर्ष काढले जातात. प्रश्नात दिलेल्या विधानातील ज्ञात तथ्यांच्या आधारे अज्ञात तथ्यांविषयी माहिती प्राप्त केली जाते आणि विधानातून योग्य निष्कर्ष काढला जातो. म्हणजेच यात विधानाचे आकलन, त्यात अध्याहृत गृहीतके, दिलेल्या विषयांतील वाद-विवादातील मुद्दे यांचे तर्कनिष्ठ अर्थ निर्णयन करून त्याआधारे निष्कर्ष काढणे व त्याची सत्यता तपासणे महत्त्वपूर्ण ठरते.
विधानासोबत दिलेल्या
गृहीतकांची अध्याहृतता तपासणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश असतो. तर्कशास्त्रात
दिलेल्या विधानांवर आधारित निष्कर्ष काढायचा असतो. ही विधाने वास्तव जगाशी जुळणारी
असतात अथवा विपरीतही असू शकतात. वास्तव जगातील घटनांशी कितीही विपरत् असली तरी ती
पूर्णपणे सत्य मानावयाची असतात. ती पूर्वसिद्ध असतात. म्हणून त्यास पूर्वपक्ष, अभ्युपगम वा विधाने असे
म्हटले जाते. ही विधाने सकारात्मक, नकारात्मक अशी विविध प्रकारची असतात. तर्कशास्त्रातील नियमांच्या
आधारे, विधानांचे
स्वरूप पाहून, तर्कशुद्ध
विचार करून विधानाच्या निष्कर्षांप्रत जाणे महत्त्वाचे मानले जाते. निष्कर्ष
काढताना आकृत्यांचाही उपयोग करता येतो. गृहीतके हा यातील दुसरा घटक होय. एखादे विधान
करताना विधानकर्त्यांने लक्षात घेतलेल्या बाबी म्हणजे गृहीतके होय. दिलेली गृहीतके
विधानात अध्याहृत आहेत का याचे अचूक उत्तर विदय़ार्थ्यांनी द्यायचे असते.
उदा. ‘एखादे चांगले पुस्तक महाग
असले तरी ते विकले जाते’; या
विधानात एका चांगल्या पुस्तकाबाबत माहिती दिली आहे. याचा अर्थ ‘काही पुस्तके इतर
पुस्तकांपेक्षा चांगली आहेत’ हे
गृहीतक अध्याहृत आहे; परंतु ‘बहुतांश पुस्तके महाग असतात’ हे गृहीतक अध्याहृत नाही.
म्हणजेच दिलेल्या विधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ व तो शब्द त्या विधानात
असण्याचे प्रयोजन याचा विचार करून गृहीतकाची अध्याहृतता तपासली पाहिजे.
काही प्रश्नांत युक्तिवाद
दिलेले असतात. अशा प्रश्नांतील विधानात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्यांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर
सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी पुष्टी करणारी कारणे दिलेली असतात. ती
कारणे कितपत तार्किक व प्रबळ आहेत यावर त्या प्रश्नाचे उत्तर ठरते.
उदा. विधान - ‘धूम्रपानावर बंदी आणली
पाहिजे का?’
(१) होय - कारण धूम्रपानावर कोटय़वधी रुपये खर्च करणे योग्य नाही.
(२) नाही - कारण तंबाखू उद्योगातील हजारो कर्मचारी बेरोजगार होतील.
या प्रश्नात धूम्रपानावर
बंदी आणणे निश्चितच आवश्यक आहे. कारण ते आरोग्यास अपायकारक आहे; परंतु पैशाचा अपव्यय होतो
म्हणून नव्हे. तसेच लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचवून रोजगारनिर्मिती नको म्हणून
दुसऱ्या कारणाचेही समर्थन करता येत नाही. म्हणजेच विधानातील युक्तिवाद आणि
त्याखालील कारणांचा विचार करता त्यातील कोणत्या कारणाच्या आधारे मुद्दा स्पष्ट
केला आहे हे तपासणे गरजेचे आहे. या घटकाच्या तयारीसाठी विदय़ार्थ्यांकडे दिलेली
माहिती काळजीपूर्वक, वस्तुनिष्ठपणे
वाचण्याची सवय आणि त्याआधारे माहितीचे योग्य पृथक्करण करण्याची क्षमता हवी.
गृहीतकांची विधानांशी असणारी सुसंगतता अत्यंत काटेकोरपणे पडताळून पाहावी लागते.
त्या दृष्टीने दिलेल्या विधानाचे सर्व बाजूने पृथक्करण करणे, विधानातील प्रत्यक्ष
(स्पष्ट) माहितीबरोबरच अप्रत्यक्षरीत्या व्यक्त होणाऱ्या माहितीचे आकलन करणे आणि
विधान व गृहीतकांची संगती तपासणे ही कौशल्ये महत्त्वाची ठरतात. एकंदर पाहता
विविधांगी वाचन, जलद
वाचनाची सवय, विधान
आणि त्याचा गृहीतकाशी असणारा संबंध याचे नेमके आकलन या क्षमता महत्त्वाच्या ठरतात.
तसेच भरपूर सराव हे यावरील महत्त्वपूर्ण उत्तर आहे.
विश्लेषणात्मक
क्षमता
दिलेल्या माहितीचे विशिष्ट उद्देशाने केलेले पृथक्करण म्हणजे विश्लेषण होय. यात प्रामुख्याने वर्गीकरण, तुलना, बैठक व्यवस्था, घटनाक्रम, दिशाबोध, नातेसंबंध, क्रम व मोजणी सांकेतिक भाषा, समूहातील पदांमधील परस्परसंबंध ओळखणे इ.चा समावेश होतो. यासाठी जास्तीत जास्त सराव करणे महत्त्वाचे आहे. दिलेली माहिती आकृतिबद्ध केल्यास प्रश्नांची उकल लवकर करता येते.
सामग्रीचे विश्लेषण
या अभ्यासघटकात दिलेल्या
सामग्रीचे योग्य पृथक्करण करून आवश्यक आणि उपयुक्त माहिती प्राप्त करणे महत्त्वाचे
असते. ही माहिती विविध स्वरूपात दिलेली असते. विशेषत: आकृतीच्या स्वरूपात ही माहिती
दिलेली असते. उदा. विभाजित स्तंभालेख, संयुक्त स्तंभालेख,
वर्तुळालेख इ. आकृत्यांच्या स्वरूपात सांख्यिकीय माहिती प्रस्तुत
केलेली असते. आकृतीचे आकलन करताना अचूक निरीक्षणाद्वारे विविध घटकांची शीर्षके आणि
एकके यांचा विचार करावा लागतो. तसेच आकृतीच्या सूचीतील माहितीदेखील काळजीपूर्वक
पाहावी लागते.
सामग्रीच्या
विश्लेषण
सामग्रीच्या विश्लेषणावरील काही प्रश्न सोडवताना प्राथमिक अंकगणितीय क्रियादेखील उपयुक्त ठरतात. उदा. दोन बाबींच्या टक्केवारीची तुलना करण्यासंबंधी प्रश्न असल्यास त्याबाबत शेकडेवारीचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते. सरासरी, वाढ, घट यासारख्या प्रश्नांसाठीदेखील अंकगणितीय क्रियांचे ज्ञान गरजेचे असते. काही प्रश्न हे तक्ता स्वरूपातील माहितीवर आधारित असतात. तक्त्याचे अचूक पृथक्करण करून प्रश्नात विचारलेल्या नेमक्या बाबीचे आकलन करून त्यावरील प्रश्न सोडवणे शक्य होते. सामग्रीचे विश्लेषण करताना अचूक व नेमके वाचन, जलद गतीने वाचन आणि प्रश्नांचा भरपूर सराव या बाबी महत्त्वपूर्ण ठरतील. प्रश्न सोडवताना विविध प्रकारची उदाहरणे अधिक प्रमाणात सोडवावीत.
या विभागात येणाऱ्या सर्वच
अभ्यासघटकांच्या बाबतीत प्रश्नांचा सातत्यपूर्ण व भरपूर सराव ही बाब निर्णायक
ठरणार. कारण सरावाद्वारेच या घटकासाठी आवश्यक कौशल्ये निर्माण करून त्यांचा विकास
करणे शक्य आहे.
Source- (Loksatta)
whats qualification and criteria for mpse and upse?
ReplyDeletegraduation pass
ReplyDeleteNice guiding!!!
ReplyDeletewhat is CENP
ReplyDelete