Special 40 Batch

Search This Blog

Happy New Year 2017 ... नूतन वर्षाच्या शुभेच्छा ....!

*TRAVAL IN THE MILKY WAY, BUT YOU SHOULD ALWAYS ON THE GROUND BOTTOM.*

विद्यार्थी मित्रहो,
     स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासकिय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणा-या लाखो उमेदवारांसाठी हे वाक्य अतिशय उपयोगी आणि तंतोतंत लागू पडणारे आहे़़ एकाच वेळी राज्यसेवा , PSI, STI परीक्षा   तोंडावर असल्यामुळे सर्व उमेदवारांचा अत्यंत गोंधळ उडत आहे. परंतु वरील वाक्य लक्षात ठेवल्यास फार गोंधळून जाण्याची गरजच राहणार नाही.
     गरज ही शोधंाची जननी आहे या वाक्यप्रचारा प्रमाणे आपल्यातीलच काही उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर ज्ञानज्योती पुणे यांच्या मार्गदर्शन चमुने तयार केलेल्या काही टिप्स या ठिकाणी देत आहे.
अभ्यासाचा वेग वाढवायचा, अचुकता आणण्यासाठी आणि शेवटी यशश्री खेचून आणण्यासाठी या टिप्स उपयोगी ठरतील.

1)  सर्व प्रथम आपले Target निश्चीत करा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडत असेल की Target  काय निश्चीत करायचे आहे ते तर ठरवलेलेच आहे. ैSTI, PSI आणि राज्यसेवा परंतु मी या ठिकाणी आपल्यास सांगु इच्छितो की या ठिकाणी आपण प्राधान्य क्रम ठरवा़. तो ठरवताना आपण अभ्यास तयारीची समअमस इ. गोष्टी आवश्यक ठरतात गरज असल्यास ज्ञानज्योती ची मदत घ्या. आम्ही आपल्या सहकार्यासाठी नेहमीच तयार असतो. पण एकदा  Target निश्चित झाले की पुढचा टप्पा येतो Planning चा. 


2)  आपल्यास नमके काय साध्य करायचे आहे ते एकदम व्यवस्थित रित्या समजुन घेतल्यानंतर आपल्याकडे असलेला वेळ, श्रम घेण्याची तयारी व पैसा इ.
आढावा घ्या. Resoures जास्तीत जास्त अचुक पदधतीने वापरत तुम्हास Maximum Out Put  कसा करता येईल यावर विचार करा. या गोष्टी इतरांशी आपणShare ैींतम करु याचा हेतु त्याची पात्रता इ. गोष्टी तपासुन खात्र्ाी असल्याशिवाय Share करु नका. दुदैवाने आपल्या देशात फुकटचा सल्ला देणा-याची अजिबात कमतरता नाही. परंतु हा सल्ला आपल्यावर काय प्रभाव टाकेल हे सर्वचजण समजु शकत नाहीत तेव्हा BE ALERT !!!!
3) एक चांगला  STUDY PLAN बनवा अभ्यासक्रमातील सर्व मुदद,े उपमुददे, आकलन, नोटस, उजळणी ,सराव या पाय-यांवरुन जाऊ दया. तरच त्याचे  OUTPUT चांगले मिळेल. त्यामुळे एक वही बनवा त्यात असे अनेक आलेख बनवा. खात्री नमुन्यासाठी काही आलेख देत आहे़. ते उतरवा आणि त्याचा उपयोग करा. 
     हा आलेख अत्यंत ढोबळ आहे. पण असे अनेक आलेख तुम्हास प्रत्येक विषयातील उपमुददे विचारात घेऊन काढता येतील. सविस्तर मार्गदर्शन ज्ञानत्योती कार्यालयात तज्ञांमार्फत मिळेल. त्याची मदत घ्या. असा आरसा तुम्हास स्वतःचे मुल्यमापन कारण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे.
4)   दररोज अभ्यासाची डायरी लिहायची सवय लावा. तसेही नविन वर्षाच्या स्वागताचा मुहुर्त आहेच. त्यात ही सवय लावा. याने परीक्षा जसजशी जवळ येईल तसतसे तुम्हाला आपल्या तयारीत अधिकाधिक नेमकेपणा आणि परीपुर्णता प्रदान करता येईल.
     
     मग काय... करूया सुरुवात !!!
नवीन वर्षी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो व यशाचे सर्व शिखर आपण पार करो हि सदिच्छा 
तसेच नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!   
आपला,
                                                                       विशाल भेदुरकर                                                               (वित्त व लेखाधिकारी)
      Contact : 9975806127,9175800509


    No comments:

    Post a Comment

    आपला अभिप्राय येथे नोंदवावा

    Related Posts Plugin for WordPress, Blogger...
    Blogger Widgets